आपले सरकार नव्हे घोषणाबाज सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:16 AM2019-01-12T01:16:18+5:302019-01-12T01:17:18+5:30

आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने केल्या होत्या.

Our government is not the manifesto government | आपले सरकार नव्हे घोषणाबाज सरकार

आपले सरकार नव्हे घोषणाबाज सरकार

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक चव्हाण : जनसंघर्ष यात्रेचे गोंदियात जोरदार स्वागत, सभेला जिल्हाभरातील नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमचे सरकार सत्तेवर आल्यास दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, महागाई नियंत्रणात आणू, विदेशातील काळा पैसा परत आणू, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ, सिंचन प्रकल्प मार्गी लावू अशा घोषणा केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने केल्या होत्या. मात्र मागील साडेचार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. देश व राज्यात नेमके याविरुध्द चित्र आहे. सरकारने आपले सरकार असल्याचे सांगून जतनेची सहानूभुती मिळवून घेतली. मात्र आता त्याच जनतेचा सरकारला विसर पडला असून हे आपल सरकार नव्हे तर केवळ घोषणाबाज सरकार होय असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे शेतकºयांना सरसकट कर्जमाफीसह अन्य मागण्यांना घेवून राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही जनसंघर्ष यात्रा आज (दि.११) सकाळी गोंदिया येथे दाखल झाली. या यात्रेचे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील सुभाष स्कुलच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे विधानसभा उपनेते विजय वडेट्टीवार, आ.नसीम खान, गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आ.आशिष देशमुख, माजी आ.सेवक वाघाये, रामरतन राऊत, काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास अवताळे, जनसंघर्ष यात्रेचे संयोजक आशिष दुआ, एनएसआयुचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, बबनराव तायवाडे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष उषा सहारे, अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सहसराम कोरोट, उषा मेंढे, विमल नागपुरे, प्रकाश रहमतकर, आलोक मोहंती, हरिष तुलस्कर, पन्नालाल शहारे, रमेश अंबुले उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच शेतकºयांना कर्जमाफी आणि धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. मग महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी त्रस्त झाला असून मागील चार वर्षांत देशात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. या सरकारच्या धोरणामुळे केवळ शेतकरी नव्हेच तर विद्यार्थी, शैक्षणिक संस्था सुध्दा त्रस्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसून आदिवासी आश्रम शाळा,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत आहेत. त्यामुळे या सरकारला भीक लागली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. प्रास्तविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी मांडले. संचालन शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले.

नोटबंदीने गरिबांच्या बचतीवर डल्ला
मोदी सरकारने देशात नोटबंदी लागू करुन गोरगरिबांच्या बचतीवर डल्ला मारण्याचे काम केले. नोटबंदीचा कुठलाच फायदा झाला असून उलट यामुळे रोजगार आणि उद्योगावर परिणाम झाला. सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. तर भाजप-सेना सरकारचा वेळ केवळ भांडणात गेला असून त्यांना शेतकरी जनतेच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नसल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी केला.
बहुत हुई मंहगाई मार भाग जाओ मोदी सरकार
साडेचार वर्षांपूर्वी ४५० रुपयाला मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १०५० रुपये मोजावे लागत आहे. ५५ रुपये किलोचे खाद्य तेल ९० रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. तर शेतमालाल भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुत हुई मंहगाई मार भाग जाओ मोदी सरकार असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे नसीम खान म्हणाले.

पटोलेंच्या अनुपस्थितीची चर्चा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान गोंदिया जिल्ह्यात दोन ठिकाणी शुक्रवारी (दि.११) जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेच्या फलकावर आणि मंचावर सुध्दा काँग्रेसच्या अखिल भारतीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खा.नाना पटोले उपस्थिती नव्हते. शेतकºयांच्या मुद्दावरच ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून यात पटोलेच न दिसल्याने सभास्थळी याची जोरदार चर्चा होती.

मोदी फेकू तर फडणवीस फसणवीस
केंद्र व राज्यातील सरकार केवळ घोषणबाज सरकार असून एक देशाला तर दुसरा राज्याला फसवित आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. तर फडणवीस सरकारचा अद्यापही अभ्यासच सुरू आहे. साडेचार वर्षांपुर्वी पांढऱ्या दाढीचा एक बुवा रोज टीव्हीवर यायचा आणि मोठी आश्वासने देऊन जायचा. मात्र मागील साडेचार वर्षांत एकाही आश्वासनाची पुर्तत: झाली नसून मोदी फेकू तर फडणवीस फसणवीस सरकार असल्याची टिका विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारला घरचा रस्ता दाखवा
आम्ही सत्तेवर आल्यास शेतकरी हिताची धोरणे राबवू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरोधात चित्र आहे. धानाच्या हमीभावात वाढ दूरच उलट धान खरेदीवर मर्यादेचे बंधन घातले. तर अद्यापही बोनसचा पत्ता नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांना रांगेत उभे करण्याचे काम केले. मात्र कर्जमाफीचा लाभ पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सरकारकडून होणारी शेतकऱ्यांची लूट बंद व्हावी त्यांचा सन्मान व्हावा यासाठी केंद्र व राज्यातील सरकार उलथून टाकून त्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे आवाहन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.

Web Title: Our government is not the manifesto government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.