तेलीटोला वळणावर ेकारचा अपघात
By Admin | Updated: March 9, 2016 02:46 IST2016-03-09T02:46:40+5:302016-03-09T02:46:40+5:30
साखरीटोला-देवरी मार्गावरील तेलीटोला वळणावर चार चाकी वाहनाचा अपघात घडला.

तेलीटोला वळणावर ेकारचा अपघात
साखरीटोला : साखरीटोला-देवरी मार्गावरील तेलीटोला वळणावर चार चाकी वाहनाचा अपघात घडला. सदर घटना ६ मार्चला सायंकाळी ५.४५ वाजता घडली. सदर गाडी डस्टर असून गाडी सी.जी.३६-एम-०००७ असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, देवरीकडून आमगावकडे जात असताना वाहन चालकाने भरधाव वेगात गाडी चालवित असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तेलीटोला वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधकाम विभागाच्या सावधानतेच्या फलकाला धडक मारली. त्यामुळे सदर वाहनाने तीन ते चार पलट्या मारल्या. त्या वाहनातील चार प्रवासी जखमी झाले. लगेच १०८ क्रमांकाला फोन लावून रुग्णवाहिकेने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. चालक व इतर मद्य प्राशन करून होते.