जि.प.क्षेत्रस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
By Admin | Updated: March 24, 2017 01:39 IST2017-03-24T01:39:13+5:302017-03-24T01:39:13+5:30
शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र त्यांच्या माहिती अभावी सर्वसामान्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहचत नाही.

जि.प.क्षेत्रस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
गोपालदास अग्रवाल : नंगपुरा व सेंद्रीटोलात विकासकामांचे भूमिपूजन
गोंदिया : शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र त्यांच्या माहिती अभावी सर्वसामान्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहचत नाही. त्यामुळे सामाजिक जीवनात कार्य करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता व कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव जिल्हा परिषद क्षेत्रस्तरावर लवकरच विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
विधानसभा क्षेत्रातील ग्राम नंगपुरा मुर्री व सेंद्रीटोला येथील विविध विकासकामांच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पंचात समिती सभापती माधुरी हरिणखेडे व जिल्हा परिषद सदस्य सिमा मडावी प्रामुख्याने उपस्थित होत्या. भूमीपूजनांतर्गत ग्राम नंगपुरा येथे दोन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सभामंडप, ग्राम सेंद्रीटोला येथे २५१५ योजनेंतर्गत पाच लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता, तीन लाख रूपयांच्या निधीतून मरघट रस्ता बांधकाम व तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्राम पिंडकेपार येथील श्मशान शेड बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, माजी जिल्हा परिषद सदस्य मुनेंद्र नांदगाये, नंगपुरा सरपंच पुस्तकला मरसकोल्हे, उपसरपंच ब्रम्हानंद शहारे, श्यामा शरणागत, महादेव पारधी, तिर्थराज हरिणखेडे, भुवन सोनवाने, बालू लिचडे, पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहा गौतम, माजी जि.प.सदस्य बाबूलाल रहांगडाले, डॉ. सुनिल कटरे, नामदेव नांदगाये, ग्यानीराम साखरे, अशोक हरिणखेडे, हेमंत येरणे, सुरज बघेले, सुनिता टेंभेकर, संध्या तुळशीकर, माधुरी साखरे, सुवर्णा लिचडे, अनिता शरणागत, करण टेकाम व नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)