महागाईविरोधात शुक्रवारी धरणे आंदोलनाचे आयोजन
By Admin | Updated: December 9, 2014 22:53 IST2014-12-09T22:53:27+5:302014-12-09T22:53:27+5:30
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीसह ६ डाव्या पक्षांतर्फे संयुक्त आंदोलनाची मोहिम सुरु झालेली आहे. या मोहिमेंतर्गत १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजता

महागाईविरोधात शुक्रवारी धरणे आंदोलनाचे आयोजन
गोंदिया : केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीसह ६ डाव्या पक्षांतर्फे संयुक्त आंदोलनाची मोहिम सुरु झालेली आहे. या मोहिमेंतर्गत १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सामान्य जनतेची कंबरडे मोडणारी वाढती महागाई, आवश्यक औषधांंच्या किमतीत करण्यात आलेली भरमसाठ वाढ, रोजगार हमी कायदा मोडकळीस काढणे, कामगार कायदे अप्रभावी करणे व मालक हिताचे संशोधन बिल, मिल उद्योगात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, काळाधन परत आणण्याबाबत सरकाची टाळाटाळ, भूमि अधिग्रहण कायद्यात संशोधनाचा समावेश असून आंदोलनात त्यांचा तीव्र निषेध करण्यात येईल.
तसेच घटनात्मक शैक्षणिक व अल्पसंख्याक, दलित महिला व इतर मागास विभागांवर अत्याचारांचा आपल्या दीर्घकालीन संकुचित लाभाकरीता संघ परिवार सरकारच्या माध्यमाने शिक्षण संस्था, सांस्कृतिक व सामाजिक संस्थात शिरकाव करत आहेत व आपल्या फासीस्ट कट्टरपंथी सांप्रदायिकते मुळे देशात तनाव निर्माण करत आहेत. कार्पोरेट दक्षिणपंथी ताकदी आर्थिक नवउदारवादी धोरणांना लागू करत आहे.
या सर्व मुद्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, सचिव मिलिंद गणविर, रामचंद्र पाटील, सहसचिव शेखर कनौजिया, कोषाध्यक्ष सी.के. ठाकरे, करुणा गणविर, भैयालाल सहारे, प्रल्हाद उके, चरणदास भावे, परेश दुरुगवार, चंद्रप्रकाश शेंडे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अन्य सदस्यांनी केले आहे.
(शहर प्रतिनिधी)