गोंदियात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 02:06 IST2016-07-02T02:06:12+5:302016-07-02T02:06:12+5:30

लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत ...

Organizing Blood Donation Camp in Gondiya today | गोंदियात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

गोंदियात आज रक्तदान शिबिराचे आयोजन

बाबूजींची जयंती : लोकमत व आयुष ब्लड बँकेचा उपक्रम
गोंदिया : लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्या वतीने २ जुलै २०१६ रोजी हुतात्मा स्मारक, सुभाष गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबिरात विविध क्षेत्रातील नागरिक, लोकमत परिवारातील सदस्य रक्तदान करून एखाद्याला जीवदान देण्यासाठी योगदान देणार आहेत. सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात आयुष ब्लड आणि कॉम्पोनेंट लॅबचे कर्मचारी रक्तसंकलनासाठी मदत करणार आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हटल्या जाते. लोकमत वाचक वर्ग, सखी मंच सदस्य तसेच युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदात्यांना मिळणार गिफ्ट
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास प्रमाणपत्रासोबत एक गिफ्ट दिले जाणार आहे. रक्तदान करणाऱ्यांनी अधिक माहितीकरीता लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, रेल्वे स्टेशन रोड, गोंदिया येथे ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७ या क्रमांकावर संपर्क करावा.

Web Title: Organizing Blood Donation Camp in Gondiya today