संघटनेने लावणीला मंच मिळवून दिला

By Admin | Updated: March 28, 2017 00:51 IST2017-03-28T00:51:54+5:302017-03-28T00:51:54+5:30

महाराष्ट्रत प्रसिद्ध असलेली लावणी ही एक लोककला आहे. मात्र ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत राहू नये ....

The organization provided a platform to Lavani | संघटनेने लावणीला मंच मिळवून दिला

संघटनेने लावणीला मंच मिळवून दिला

सई अभिमन्यू काळे : लावणी तसेच मिस व मिसेस गोंदिया स्पर्धा थाटात
गोंदिया : महाराष्ट्रत प्रसिद्ध असलेली लावणी ही एक लोककला आहे. मात्र ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादीत राहू नये व तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी आधार महिला शक्ती संघटनेचे कार्य कौतूकास्पद आहे. या संघटनेने येथे लावणीला मंच मिळवून दिल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पत्नी सई काळे यांनी केले.
येथील आधार महिला शक्ती संघटना व लायंस क्लब गोंदिया सिव्हील यांच्यावतीने शनिवारी (दि.२५) आयोजित लावणी तसेच मिसव मिसेस गोंदिया स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगर परिषद शिक्षण सभापती भावना कदम व लता बाजपेई होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सविता विनोद अग्रवाल, अल्का अशोक इंगळे, रचना गहाणे, सोनाली देशपांडे, सविता पुराम, मृदुला वालस्कर, अनिता मेश्राम, मैथुला बिसेन, संगिता गुहा, रेखा भोंगाडे, छबू इंगळे, मंजूषा चौधरी, अंकिता शर्मा, अफसाना पठाण, सुनंदा उके, मोहिनी निंबार्ते, विमल मानकर, हेमलता पतेह, चंद्रकला देशमुख, मंजू कटरे, सविता बेदरकर, शर्मिला पाल, मंगला जायस्वाल, गिता क्षत्रीय, अनिता हीरडे, निता हटवार, निलू फुंडे उपस्थित होत्या.
याप्रसंगी भावना कदम व लता बाजपेई यांनी, अशा प्रकारचे आयोजन मुली व महिलांत उत्साह निर्माण करते. तसेच त्यांच्या मनोरंजन व त्यांना संघटीत करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य संघटना करीत असल्याचे मत व्यक्त केले. संचालन सुजाता बहेकार व सिमा बैतुले यांनी केले. आभार कदम व बाजपेई यांनी मानले. कार्यक्रमाला सुमारे एक हजार हून अधिक संख्येत महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सिमा डोये, अनिता चौरावार, निता क्षत्रिय, प्रज्ञा मेहता, कृतीका सेठ, सुनिता धरमशहारे, करिश्मा संघानी, पुनम अरोरा, दिपा काशिवार, रिना अग्रवाल, माया राघोर्ते, हर्षा येरणे, वैशाली गिऱ्हेपुंजे, ज्योती देशमुख, प्रणीता कुलकर्णी, वंदना घाटे, रिंपल कुंभलवार, मिना पाथोडे, प्रिती येटरे, रेखा भरणे, हंसा शर्मा, अंजली सिरसकर, छाया देशमुख, मिना डुंबरे, पुजा तिवारी, आरती सावंत, मंजू कारलेकर, प्रिया सावंत, उमा महाजन, करूणा श्रीवास्तव, सुवर्णा कदम आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

श्रृती केकत व हर्षा निमकर ठरल्या ‘लावणी क्विन’
या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते श्रृती केकत आणि हर्ष निमकर या ‘लावणी क्विन’ ठरल्या. विशेष म्हणजे. यंदा लावणी स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेणाऱ्या तसेच सुरूवातीपासून भाग घेणाऱ्या महिलांचा गट तयार करून स्पर्धा घेण्यात आली. यात पहिल्यांदा भाग घेणाऱ्यांत हर्षा निमकर तर तिसऱ्यांदा भाग घेणाऱ्या गटात श्रृती केकत यांनी प्रथम, मंजरी देशभ्रतार व कंचन अडवानी, अलका बावने व हिमेश्वरी कावळे यांनी द्वितीय व दिशा गुप्ता यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. त्याचप्रकारे मिस गोंदिया स्पर्धेत ज्योत्सना दियेवार हिने प्रथम, निधी बैतुले हिने द्वितीय, रिया ठाकूर हिने तृतीय तर मिसेस गोंदिया स्पर्धेत शितल शहा यांनी प्रथम, काव्या अडवानी यांनी द्वितीय तर संजीवनी भेलावे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. निरीक्षक म्हणून स्नेहा मानकर व रजनी भिसीकर यांनी काम बघितले. लावणी स्पर्धेत ३५ तर मिस गोंदिया स्पर्धेत २२ व मिसेस गोंदिया स्पर्धेत २० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Web Title: The organization provided a platform to Lavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.