कृषी पंप थकबाकीदारांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:22 IST2017-11-09T21:21:47+5:302017-11-09T21:22:01+5:30
महावितरणच्या गोंदिया परिमंडळातील कृषी पंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषी पंपधारक चालू बिल भरणार नाहीत ....

कृषी पंप थकबाकीदारांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महावितरणच्या गोंदिया परिमंडळातील कृषी पंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषी पंपधारक चालू बिल भरणार नाहीत अशा कृषी पंप वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. या थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली असून यात पाच हप्त्यात बिल भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
गोंदिया परिमंडळाअंतर्गत असलेल्या कृषी पंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीनेच आता कृषी पंप ग्राहकांच्या वीज बिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, चालू बिल कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी गोंदिया व भंडारा जिल्हयामध्ये कृषी पंपधारकांची वीज बिल वसुली मोहीम राबविली जाणार आहे.
परिमंडळामध्ये एकुण ६३ हजार ९१४ कृषी पंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर ११० कोटी ४९ लाख रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ३७ हजार ६९८ ग्राहकांकडे ६८ कोटी ४२ लाख ३० हजार व गोंदिया जिल्ह्यातील २६ हजार २१६ ग्राहकांकडे ४२ कोटी ०७ लाख ०१ हजार रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी पंप जोडणी घेतल्यापासुन ११ हजार ९६१ ग्राहकांनी एकदाही वीज बिल भरलेले नाही त्यांच्याकडे १४ कोटी ४१ लाख ७४ हजार एवढी थकबाकी आहे.
महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री कृषी पंपधारक संजीवनी योजना २०१७’ जाहीर झाली असून, या योजनेमुळे वीज बिलांची थकबाकी असलेल्या शेतकºयांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मुळ थकबाकीच्या पाच समान हप्त्यात थकबाकी भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज बिलातून मिळणार संपूर्ण माहिती
या योजनेत लाभार्थी शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून संपूर्ण मािहतीयुक्त वीज बिल देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हफ्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी शेतकºयांच्या बिलात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७’ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या बिलात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्र ी क्र मांक नमूद केलेला आहे. बिलाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतक ºयांनी किती रक्कम भरायची आहे याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या बिलात महावितरणकडून ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी असणाºया ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ३० हजार रूपयांपेक्षा जास्त असणाºया शेतकºयांना १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत. याची सविस्तर माहितीही बिलात देण्यात आलेली आहे. तसेच, मुख्यमंत्री कृषी संजीवनी थकबाकीचें हफ्ते नियमित भरणाºया शेतकºयांना नेमका किती रु पयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे.