कवलेवाडा घाटावरून खुलेआम रेती चोरी

By Admin | Updated: May 30, 2014 00:09 IST2014-05-30T00:09:53+5:302014-05-30T00:09:53+5:30

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती माफिया अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून घेऊन जात आहेत. मात्र या प्रकाराकडे तिरोड्याच्या महसूल विभागाचे

Openly theft on the Kawlawada Ghat | कवलेवाडा घाटावरून खुलेआम रेती चोरी

कवलेवाडा घाटावरून खुलेआम रेती चोरी

महसूल बुडतोय : तलाठी साज्यासमोरूनच होते राजरोसपणे वाहतूक
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेती माफिया अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरून घेऊन जात आहेत. मात्र या प्रकाराकडे तिरोड्याच्या महसूल विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे रेती चोरीला प्रोत्साहन देत आहेत. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी लिलावात न काढलेल्या कवलेवाडा रेतीघाटावर आता मोठय़ा प्रमाणात रेती माफिया सक्रीय आहेत. दररोज ५0 ते ६0 ट्रॉली रेती या घाटावरून उपसा केली जात आहे. कवलेवाडा साज्याचे तलाठी पी.एफ. जाधव यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या रेती चोरीला ऊत आल्याचे बोलले जात आहे. कवलेवाडा येथील तलाठय़ांचे कार्यालय याच रेतीघाटाच्या मार्गावर आहे. त्याच मार्गाने अवैध रेतीची वाहतूक होत असताना तलाठी कारवाई का करीत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तिरोडा शहरातून जाणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या मार्गाने कवलेवाडा नदी घाटावर जातात व अवैध रेती भरून याच मार्गाने परतात. शिवाय चिरेखनी गावाकडील मार्गानेसुद्धा या घाटावर पोहोचून रेती ट्रॉलीत भरून त्याच मार्गाने परत जातात. असे असतानाही तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.
रेतीमाफियांच्या मनात कारवाईची कोणतीच भिती नसल्यामुळे त्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू आहेत. जिल्ह्यातील १७ रेतीघाटांचा लिलाव अद्यापही झालेला नाही. तो न होण्यामागे रेती माफियांचे सामूहिक षडयंत्र असल्याचे बोलले जाते.
उल्लेखनिय म्हणजे या अवैध रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्यांच्या सततच्या रहदारीमुळे तिरोडा ते कवलेवाडा रस्ता व चिरेखनी ते कवलेवाडा रस्ता पार उघडून गेला आहे. या रस्त्यांना ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Openly theft on the Kawlawada Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.