आमगाव ‘शिवार’चे उत्साहात लोकार्पण

By Admin | Updated: August 26, 2016 01:34 IST2016-08-26T01:34:02+5:302016-08-26T01:34:02+5:30

आमगाव तालुक्यातील पर्यटनासह विविध समस्या व विविध विषयांना घेऊन काढण्यात आलेल्या आमगाव तालुका शिवार पुरवणीचे

Opening with the excitement of 'Aamgaon' Shivar | आमगाव ‘शिवार’चे उत्साहात लोकार्पण

आमगाव ‘शिवार’चे उत्साहात लोकार्पण

मान्यवरांची उपस्थिती : लोकमत समाजहित जपणारे वृत्तपत्र
आमगाव : आमगाव तालुक्यातील पर्यटनासह विविध समस्या व विविध विषयांना घेऊन काढण्यात आलेल्या आमगाव तालुका शिवार पुरवणीचे आमगावमध्ये उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार साहेबराव राठोड, साहित्यिक प्रा.लोकचंद राणे, सहाय्यक पशुधनविकास अधिकारी डॉ.सुरेश गराडे यांच्यासह गोंदिया तालुका प्रतिनिधी नरेश रहिले, व आमगाव तालुका प्रतिनिधी ओ.बी. डोंगरवार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार राठोड म्हणाले, लोकमत समाजहित जपणारे वृत्तपत्र आहे. छोट्या बातम्यांसह मोठे गबाड उकरुन काढून अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम हे वृत्तपत्र करीत आहे. विविध विषयावर कार्यक्रम राबवून समाजऋण फेडण्याचे काम अनेक वर्षापासून करीत आहे. लोकमतचे कार्य सदैव समाजाला प्रेरणा देणारे आहे.
यावेळी प्रा.लोकचंद राणे म्हणाले, परिसरातील विविध विषयांना हाताळण्यासोबतच भवभुतींच्या स्मारकाची गरज आहे. कालिदास यांच्या बरोबरीचे असलेले महाकवी भवभूती शासनाच्या उदासिनतेमुळे जनतेत रुजले गेले नाही.
शासनाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत स्मारक होऊ शकले नाही. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लोकमतने या विषयाकडे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र त्याचा पाठपुरावा होऊन लोकप्रतिनिधींनीही त्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सुरेश गराडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उडाण बहुउद्देशिय विकास संस्थेचे अध्यक्ष आशिष तलमले यांनी केले. आभार नरेश रहिले यांनी मानले. यशस्वितेसाठी हरिष भुते, नरेश बोहरे, अतुल फुंडे, मुकेश डोंगरवार, आशिष पाऊलझगडे व इतरांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Opening with the excitement of 'Aamgaon' Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.