बंधाऱ्याच्या कामातील गैरप्रकार झाला उघड
By Admin | Updated: November 29, 2014 01:44 IST2014-11-29T01:44:19+5:302014-11-29T01:44:19+5:30
बेरडीपार-डब्बेटोला नाल्यावर मे-जून २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.

बंधाऱ्याच्या कामातील गैरप्रकार झाला उघड
काचेवानी : बेरडीपार-डब्बेटोला नाल्यावर मे-जून २०१२ मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जामुळे झाल्याने या बंधाऱ्याच्या शेजारची माती वाहून गेली. या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सन २०१२ मध्ये बेरडीपार-डब्बेटोला या नाल्यावर एकूण पाच सिंमेट बंधारे तयार करण्यात आले. या बंधाऱ्याच्या जागेची निवड कृषी सहायक कुवरलाल उंदर रहांगडाले यांनी केली आहे. मंडळ, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी टेबलावर बसून जागा योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे लाखो रुपयाचे बंधारे अयोग्य ठरले. बंधारे जागोजागी फुटले असल्यामुळे या ठिकाणी पाणी राहरात नाही. जागोजागी फुटला असलेला बंधारा मागील दोन वर्षापासून तसाच पडला आहे. या तुटलेल्या बंधाऱ्याची जाणीव नाही, असे तालुका कृषी अधिकारी पी.व्ही.पोटदुखे म्हणाले.
प्रभारी मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. शेतकऱ्यांची ओरड आणि माध्यमांच्या हस्तक्षेपानंतर यावर्षी दुरूस्ती बद्दल निधी मागविण्यात येणार असल्याचे ताकृअ पोटदुखे यांनी सांगितले.
बेरडीपार नाल्यावर सिमेंट बंधाऱ्रा तयार करण्यासाठी जागेची निवड आणि अंजापत्रक कृषी सहायक के.यु.रहांगडाले यांनी तयार केले. त्या बंधाऱ्याला डोळे मिटून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. जागेची निवड चुकीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे काम कृषी सहायक के.यु. रहांगडाले यांच्या निर्देशनात सुरू असतांना कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप बेरडीपारचे तत्कालीन सरपंच गणेश कोल्हटकर यांनी केला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिक्षक यांनी तपास केला नाही. उलट कृषी सहायक के.यु.रहांगडाले सोबत आर्थिक देवाण-घेवाण करून व पाठीशी घालून स्वच्छ अहवाल कृषी उपायुक्त नागपूर यांना पाठविला आहे. २०१२ ला तयार करण्यात आलेले बंधारे तुटफूट झाले आहेत. एका बंधाऱ्याचे काठ वाहून गेले असून आज दोन वर्ष संपले तरी बंधारा दुरुस्त करण्यात आला नाही. दोन ते तीन बंधाऱ्याला पिचिंग केली नाही. बंधारे तयार करतांना काठाच्या बाजूला आणि समोर पिचिंग करावी लागते. मात्र कृषी सहायकांने कसल्याही प्रकारची पिचिंग न करता तत्कालीन मंडळ कृषी अधिकारी एस.के.राठोड यांच्या सहकार्याने दीड लाख रुपये हडप केले.
हे दीड लाख रूपये शासनाला परत करणार असल्याचे एस.के. राठोड यांनी सांगितले. नव्याने रूजू झालेले पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले यांनी धनादेशाद्वारे एस.के. राठोड यांनी रकम भरल्याचे सांगितले. बंधाऱ्यांच कामे त्वरीत करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या कृषी सहायक, पर्यवेक्षक, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)