खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २६ रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST2021-09-23T04:32:53+5:302021-09-23T04:32:53+5:30

भारतीय बौद्ध महासभेची बैठक ४ ऑक्टोबर रोजी गोंदिया : द बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) चे राष्ट्रीय ...

Open Rapid Chess Tournament on 26th | खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २६ रोजी

खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २६ रोजी

भारतीय बौद्ध महासभेची बैठक ४ ऑक्टोबर रोजी

गोंदिया : द बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे ४ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे येत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक विश्रामगृहात सकाळी ११ वाजता बैठक होणार असून, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहे.

............

गौरव फरदेची निवड ()

गोंदिया : मध्य प्रदेशातील इंदूर येथे २८ सप्टेंबरपासून होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेकरिता मिस्टिक्स क्रिकेट अकादमीचा लेफ्ट आर्म स्पिनर गौरव फरदे याची अंडर १९च्या विदर्भ संघात निवड करण्यात आली आहे. गौरव याच्या निवडीबद्दल माजी आ. गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, पुष्पक जस्सानी, लोकेश यादव, पार्थ खंडेलवाल, मदन उपाध्याय, चेतन मानकर, विशालसिंग ठाकूर यांनी कौतुक केले आहे.

.........

महिला बँकेची आमसभा २५ रोजी

गोंदिया : दि महिला अर्बन को-ऑप बँकेची २७ वी वार्षिक आमसभा २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे. बँकेने पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून सर्व सभासदांनी यात सहभागी व्हावे, असे बँकेच्या अध्यक्षा माधुरी नासरे यांनी कळविले आहे.

Web Title: Open Rapid Chess Tournament on 26th