उघड्या विद्युत डीपी देत आहेत अपघाताला आमंत्रण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST2021-02-11T04:31:07+5:302021-02-11T04:31:07+5:30

खातिया : गोंदिया तालुक्यातील कामठा, रावणवाडी परिसरात विद्युत डीपी उघड्या असल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

Open DP invites accidents () | उघड्या विद्युत डीपी देत आहेत अपघाताला आमंत्रण ()

उघड्या विद्युत डीपी देत आहेत अपघाताला आमंत्रण ()

खातिया : गोंदिया तालुक्यातील कामठा, रावणवाडी परिसरात विद्युत डीपी उघड्या असल्यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे विद्युत विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

रावणवाडी व कामठा परिसरातील अनेक गावांमध्ये सुरक्षा झाकणाविना विद्युत डीपी मोठ्या प्रमाणात आहेत. या विद्युत डीपी उघड्या असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब ओळखून परिसरातील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला पत्र देऊन डीपीला झाकणे लावण्याची मागणी केली. परंतु, त्याची संबंधित विभागाने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे धोका कायम आहे. रावणवाडी ते कामठा क्षेत्रातील अर्जुनी, खातिया, परसवाडा, चिरामनटोला या परिसरात उघड्या विद्युत डीपींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेऊन उघड्या डीपींना झाकणे लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Open DP invites accidents ()