शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे केवळ कागदी घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:15 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाला दिलेल्या अहवालात मार्च ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच यावर उपाय योजना सुचविल्या होत्या.मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केवळ निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे याकडे दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देचार गावांना टँकरने पाणीपुरवठा : तरी प्रशासन म्हणते ‘आॅल इज वेल’

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाला दिलेल्या अहवालात मार्च ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच यावर उपाय योजना सुचविल्या होत्या.मात्र जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केवळ निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे याकडे दुर्लक्ष केले. परिणामी जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही प्रशासन कागदीघोडे नाचवून सर्व आॅल ईज वेल असल्याचे सांगत आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरीच्या ११३४ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ ९४० मि.मी.पावसाची नोंद झाली. परिणामी सिंचन प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणीसाठा असून जिल्ह्यातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.भूजल सर्वेक्षण विभाग आणि जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यात दुसऱ्या टप्प्यात १४३ तर तिसऱ्या टप्प्यात ३९८ गावे आणि १५३ वाड्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती.या एकूण ६९४ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ जि.प.ने कागदावरच केल्या त्यामुळे टँकरमुक्त जिल्ह्यात यंदा प्रथमच टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मात्र यानंतरही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. २०१७-१८ या वर्षात पाणी टंचाईवर उपाय योजना करण्यासाठी २ कोटी ३३ लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. यापैकी २ कोटी १९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले तर १४ लाख १३ हजार रुपये खर्च करण्यात आले नाही. तर सन २०१८-१९ मध्ये महसूली क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांचे वीज देयक अदा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला शासनाने ६२ लाख ३ हजार रुपयांचा निधी दिला होता. पण यापैकी केवळ २२ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले. तर ३९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला नाही. मागील वर्षी सुध्दा २१९ गावांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला. तर यंदा पुन्हा त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना केवळ कागदावर करुन पाणी टंचाई नसल्याचे दाखविले जात आहे.टँकरने पाणी पुरवठापाणी टंचाईवर उपाय योजना करण्यात प्रशासन फेल झाले. त्यामुळे गोंदिया शहरासह गोरेगाव नगर पंचायतमध्ये २ टँकरने तर गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यात सुध्दा हेच चित्र असून या तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.पाणी पुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजनजि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा जिल्हावासीयांना पाणी टंचाई समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून दूरवर पायपीट करावी लागत आहे. मे महिन्याला सुरूवात होवून सुध्दा पाणी पुरवठा विभागाच्या उपाय योजना कागदावरच आहे. यावरुन हा विभाग किती जागृत आहे हे दिसून येते.पाणी पुरवठा योजना बंदसालेकसा तालुक्यातील लटोरी आणि परिसरातील ३० गावांना पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना पूर्णत: बंद पडल्याने पाणी टंचाईच्या समस्येत अधिक वाढ झाली आहे. तर देवरी तालुक्यातील बोरगाव (शिलापूर) येथे नळ योजना विहिरीजवळ नवीन विंधन विहिर तयार करुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहे.पालकमंत्र्यांना मतदारसंघाची काळजीपालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, पिपरी, बौध्दनगर, पुतळी,दोडके जांभळी गावांना भेटी देवून पाणी टंचाईचा आढावा घेतला. मात्र जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई