प्रवाशांअभावी एकमात्र बस फेरीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST2021-05-17T04:27:31+5:302021-05-17T04:27:31+5:30
गोंदिया आगारातून आमगाव, सालेकसा, देवरी, साकोली, गोंदिया, भंडारा, नागपूरला तसेच राज्यातील इतर मोठ्या शहरात लांबपल्ल्याच्या बसफेऱ्या चालतात. यासोबतच आंतरराज्यीय ...

प्रवाशांअभावी एकमात्र बस फेरीला ब्रेक
गोंदिया आगारातून आमगाव, सालेकसा, देवरी, साकोली, गोंदिया, भंडारा, नागपूरला तसेच राज्यातील इतर मोठ्या शहरात लांबपल्ल्याच्या बसफेऱ्या चालतात. यासोबतच आंतरराज्यीय सेवेंतर्गत बालाघाट व डोंगरगढ येथे ही बसफेऱ्या सुरू होत्या.? मात्र मागील वर्षी कोरोना संसर्ग व टाळेबंदीमुळे सर्वच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या.? दरम्यान, टाळेबंदीतील विविधतेमुळे मे महिन्यापासून कोविड दिशानिर्देशांचे पालन करीत बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याने नागरिक प्रवास करणे टाळत आहेत. परिणामी दुसऱ्या टाळेबंदीत सुरुवातीला मोजक्याच बसफेऱ्या सोडण्यात येत होत्या, तर प्रवासीच मिळत नसल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासून गोंदिया ते नागपूर ही एकच बसफेरी सोडली जात होती. मात्र या बसफेरीला प्रवासीच मिळत नसल्याने अखेरीस ही बसफेरी बंद करण्याचा निर्णय आगाराला घ्यावा लागला आहे.