जिल्ह्यातील ग्रा.पं.ची करवसुली केवळ ४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST2020-10-07T05:00:00+5:302020-10-07T05:00:11+5:30

जिल्ह्यात मागीलवर्षी ग्रामपंचायतची मालमत्ताकर वसुली ६७.५७ टक्के तर पाणीपट्टी वसुली ६९.४४ टक्के होती. परंतु कोरोनामुळे यंदा ही वसुली केवळ ४ टक्के झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचरांचे वेतन मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. काही ग्रामपंचायतच्या परिवारांचे वेतन वर्षभरापासून काढण्यात आले नाही.

Only 4% tax collection in the district | जिल्ह्यातील ग्रा.पं.ची करवसुली केवळ ४ टक्के

जिल्ह्यातील ग्रा.पं.ची करवसुली केवळ ४ टक्के

ठळक मुद्देगावगाड्याचा विकास थांबला : २७.५५ कोटींचे कर थकीत, कोरोना संक्रमणाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागाचा विकास ग्रामपंचायतल्या विविध कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायत संकटात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींची मालमत्ता वसुली ४.३३ तर पाणीपट्टीकर वसुली ३.९४ टक्के आहे.९६ टक्के कर थकीत असल्याने ग्रामपंचायत कारभार कसा चालवायचा प्रश्न ग्रामसेवकांपुढे निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात मागीलवर्षी ग्रामपंचायतची मालमत्ताकर वसुली ६७.५७ टक्के तर पाणीपट्टी वसुली ६९.४४ टक्के होती. परंतु कोरोनामुळे यंदा ही वसुली केवळ ४ टक्के झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचरांचे वेतन मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. काही ग्रामपंचायतच्या परिवारांचे वेतन वर्षभरापासून काढण्यात आले नाही. शासनाने करवसुलीच्या आधारावरच परिचरांचे वेतन करायचे असा नियम असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचारांची आता मोठी समस्या झाली आहे. जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या जून अखेरपर्यंतची परिस्थिती पाहिली असता जिल्ह्यातील ६ कोटी ३५ लाख ३ हजार ८९३ रूपये पाणीपट्टी तर २१ कोटी २० लाख ३२ हजार ६८ रूपये घरकर थकीत आहे. दोन्ही प्रकारचे कर घेतल्यास २७ कोटी ३५ लाखाच्यावर थकीत कर आहे. त्यामुळे गावातील विविध विकास कामे, सोबतच ग्रामपंचायत उत्पन्नातून करण्यात येणारी सर्व कामे रखडली आहेत.ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या परिचरांना आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
मागील सहा महिन्यांपासून वेतन झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांत तणाव वाढत आहे. गोंदिया जिल्ह्यात ३६ लाख ३ हजार ३५८ रुपये मालमत्ताकर वसुली जून अखेरपर्यंत वसूल करण्यात आली. जूनी आणि नवीन मिळून सन २०१९-२० व २०२०-२१२ ची ९६ लाख १८६९ रुपये घर कर वसुली करण्यात आली आहे. त्या वसुलीची टक्केवारी ४.३३ आहे. २१ कोटी २० लाख ३२ हजार ६८ रूपये थकीत आहेत. पाणीपट्टीकर वसुलीत ३.९४ टक्के वसुली झाली आहे. यात २६ लाख ५ हजार ६७८ रुपये पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला.६ कोटी ३५ लाख ३ हजार ८९३ रु पये पाणीपट्टी कर थकीत आहे. एकंदरीत ९६ टक्के पाणीपट्टी व मालमत्ताकर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार चालवायचा कसा हा प्रश्न ग्रामसेवकांना पडला आहे.

तीन तालुक्यांची मालमत्ताकर वसुली शून्य
गोंदिया जिल्हा परिषदेने जून अखेरपर्यंत घरकर व पाणीपट्टी कर या संदर्भात आढावा घेतला असता सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी या तीन तालुक्यातील घरकर व पाणीपट्टीकर वसुली शून्य आहे. गोरेगाव तालुक्याची पाणीपट्टीची कर वसुली टक्केवारी ०.३३ गृहकरात १.४७ टक्केच वसूली आहे.

Web Title: Only 4% tax collection in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.