शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशासकीय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:46+5:302021-03-31T04:28:46+5:30
उद्घाटन प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रख्यात वक्त्यांनी प्रशासन आणि व्यावसायिकतेची गुंतागुंत करून त्यांनी त्यांच्या ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन प्रशासकीय प्रशिक्षण
उद्घाटन प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व प्रख्यात वक्त्यांनी प्रशासन आणि व्यावसायिकतेची गुंतागुंत करून त्यांनी त्यांच्या क्षमता, आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने सहभागींना समाधानी केले. मनीबेन नानावटी वुमेन्स कॉलेज (मुंबई)मधील कार्यालयीन अधीक्षक केया मुखर्जी, मुख्य लिपिक आरती महाडिक, धोटे बंधू महाविद्यालयातील डॉ. राकेश धुवारे, डॉ. आनंद मोरे, डॉ. अजाज शेख, डॉ. जयंत महाखोडे, मितेश कटरे, डॉ. दिलीप जेना, डॉ. दिलीप चौधरी, प्रा. व्ही.एम. सोनी, प्रा. राजकुमार पटले यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. दररोज दोन-तीन माहितीपूर्ण सत्रे देण्यात आली. प्रशासनाच्या क्षेत्रात कौशल्य व अनुभव असलेल्या प्रख्यात वक्त्यांनी त्यांची अभ्यासपूर्ण चर्चा अतिशय प्रभावी, माहितीपूर्ण व सूचनात्मक पद्धतीने मांडली. ज्यामुळे मेन्टी संस्था तसेच धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा झाला.
उपप्राचार्य प्रा.एस.पी. तिमांडे व डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित ऑनलाइन प्रशासकीय प्रशिक्षणाचे संचालन डॉ. शुभांगी नरडे यांनी केले. आभार डॉ. जेना यांनी मानले. प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात आले.