शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 9:11 PM

गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना होणार आहे.

ठळक मुद्दे९५४ गावांत सार्वजनिक गणपती : ५२०७ खासगी गणपतींची स्थापना होणार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटलांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत समित्यांनी ‘एक गाव-एक गणपती’ची सुरूवात केली. गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना होणार आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणपतींची मूर्ती माडली जायची. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे व गावची शांतता धोक्यात येत होती.या उत्सवादरम्यान गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४१६ गावांत राबविली जात आहे. त्यानुसार, गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत २, गोंदिया ग्रामीण २०, रावणवाडी २८, तिरोडा २५, गंगाझरी २०, दवनीवाडा ५, आमगाव २४, गोरेगाव ३३, सालेकसा ५, देवरी ३४, चिचगड ४४, डुग्गीपार ४३, नवेगावबांध २१, अर्जुनी-मोरगाव ३६, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत २१ गावांत एकच गणपती स्थापन केले जाणार आहे.याशिवाय, गोंदिया शहरात सार्वजनिक ८२ तर खासगी ९३० मूर्तिची स्थापना केली जाणार आहेत. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५ तर खासगी ५००, गोंदिया ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक ११० तर खासगी ४००, रावणवाडी अंतर्गत सार्वजनिक ६२ तर खासगी ३००, तिरोडा अंतर्गत सार्वजनिक ४७ तर खासगी २५०, गंगाझरी अंतर्गत सार्वजनिक ३७ तर खासगी ७२, दवनीवाडा अंतर्गत सार्वजनिक १३ तर खासगी ७०, आमगाव अंतर्गत सार्वजनिक ६३ तर खासगी ७५०, गोरेगाव अंतर्गत सार्वजनिक ५५ तर खासगी ३२५, सालेकसा अंतर्गत सार्वजनिक १०४ तर खासगी २१५, देवरी अंतर्गत सार्वजनिक ५९ तर खासगी २२५, चिचगड अंतर्गत सार्वजनिक ५५ तर खासगी ४०, डुग्गीपार अंतर्गत सार्वजनिक ८२ तर खासगी २७०, नवेगावबांध अंतर्गत सार्वजनिक २६ तर खासगी १६५, अर्जुनी-मोरगाव अंतर्गत सार्वजनिक ६६ तर खासगी ३७०, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २८ तर खासगी ३२५ गणपतींची स्थापना होणार आहे.लोकमान्य उत्सवाकडे पाठगणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२८ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. त्यांचे व्यक्तीमत्व आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्टÑ शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य उत्सव राबवायचे म्हणून सन २०१६ मध्ये लोकमान्य उत्सवाची सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्याच वर्षापासून या उत्सवाला बंद करण्यात आले. स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ व जलसंवर्धन यावर जनजागृती करण्याचा उपक्रम पहिल्या वर्षी राबविला. परंतु दुसºया वर्षापासून या उत्सवाला तिलांजली देण्यात आली. गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमाला चालना देण्यासाठी शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.चोख बंदोबस्तासाठी पथकगणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथक तयार करण्यात येणार आहेत. यात, दंगल नियंत्रक तीन पथक, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स व सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध- नाशक पथकही नेमण्यात आले आहे.सुरक्षा दल राहणार सज्जगावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे. गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पाडता याव्या यासाठी तंटामुक्त समित्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दलाला सज्ज केले आहे. मूर्तिच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दलाने पुढाकार घेतला आहे.मंडळानी हे करावेगणपती उत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तिच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी व जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव