टँकरच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 00:16 IST2017-05-07T00:16:07+5:302017-05-07T00:16:07+5:30
आमगाव तालुक्याच्या रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता एका दुधाच्या टॅकरने मोटारसायकलला

टँकरच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव तालुक्याच्या रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता एका दुधाच्या टॅकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एक ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. टॅकर एमएच१६/एवाय-७११५ च्या चालकाने बंद असलेल्या रेल्वे फाटकाला धडक दिली. यावेळी रेल्वे गेट बंद असल्यामुळे मोटारसायकल एमएच३५/यु-३३१३ या मोटारसायकलवर बसलेल्या तिघांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यातील एकाचा उपचार घेताना रात्री ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
दीपक हंसराज तुरकर (२२) रा. बोरकन्हार असे मृताचे नाव आहे. तर दिनेश केशोराव बागडे (२४) व निलेश्वरी केशोराव बागडे (२२) असे गंभीर जखमी असलेल्या बहिण भावांची नावे आहेत. जखमींना वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले.आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३८, ४२७ सहकलम १८४,१३४ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.