वडेगाव येथे शंभर टक्के लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST2021-05-08T04:30:06+5:302021-05-08T04:30:06+5:30
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, डाॅ. रुबी रिनाईत, डाॅ. तुलसी भगत ...

वडेगाव येथे शंभर टक्के लसीकरण ()
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, डाॅ. रुबी रिनाईत, डाॅ. तुलसी भगत उपस्थित होते. केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षेवयावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे ठरविले आहे. सर्वांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. त्यानुसार परिसरातील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन लसीकरण करून घेतले. सरपंच तुमेश्वरी बघेले, आरोग्य सेविका मेश्राम लांडगे, बन्सोड, कोरोना तपासक बिसेन, औषध वितरक तुमसरे, केंद्रप्रमुख विलास डोंगरे, केंद्रप्रमुख व नोडल अधिकारी वडेगाव, सुजित पवार, एच.एम.रहांगडाले, संजय मडावी, ग्रामसेवक डोंगरे,आशा गटप्रवर्तक रेखा पटले, दीपा टेंभरे, अनिता बघेले, कांता भेलावे, हंसकला भेलावे, अश्विनी मेश्राम यांनी सहकार्य केले.