एक दिवसीय पालक कार्यशाळा
By Admin | Updated: August 13, 2015 02:18 IST2015-08-13T02:18:32+5:302015-08-13T02:18:32+5:30
स्थानिक श्यामराव झरारिया सभागृहात विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष अजय गौर ....

एक दिवसीय पालक कार्यशाळा
तिरोडा : स्थानिक श्यामराव झरारिया सभागृहात विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष अजय गौर व मित्र परिवाराच्या वतीने एक दिवसीय पालक कार्यशाळा पार पडली.
सदर कार्यशाळेत डॉ. राकेश कृपलानी यांचे मार्गदर्शन झाले. अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश जायस्वाल होते. अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष ममता बैस, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, सुबोधसिंग, माजी नगराध्यक्ष राखी गुणेरिया, न.प. सदस्य सलीम जवेरी, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन उपस्थित होते.या वेळी केक कापून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. लहानसहान बालकांचे गीत व नृत्य झाले. डॉ. राकेश कृपलानी यांनी पाल्यांचे अभ्यास, जेवण, असभ्य वागणूक अशा विविध समस्यांच्या कारणांचा शोध घेवून मार्गदर्शन केले. या वेळी पं.स. सभापती उषा संजय किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, माजी पं.स. सदस्य संजय किंदरले, न.प. सदस्य राजेश असाटी प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन संदीप खनंग, प्रास्ताविक न.प. अध्यक्ष अजय गौर यांनी तर आभार योगिता तोमर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बबलू ठाकूर, बंटी असाटी, सागर खनंग, किसनू असाटी, मीनू चवरे, अजय तोमर व मित्र परिवार यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)