मोहफुलांच्या दारूसह दीड लाखाचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST2021-07-25T04:24:49+5:302021-07-25T04:24:49+5:30

गोंदिया : ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबवून आठ ठिकाणी धाड घालून मोहफुलांची दारू व अन्य साहित्य असा ...

One and a half lakh items including Mohful's liquor confiscated | मोहफुलांच्या दारूसह दीड लाखाचे साहित्य जप्त

मोहफुलांच्या दारूसह दीड लाखाचे साहित्य जप्त

गोंदिया : ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबवून आठ ठिकाणी धाड घालून मोहफुलांची दारू व अन्य साहित्य असा दीड लाख रुपयांचा माल जप्त केला. शुक्रवारी (दि.२३) ही कारवाई करण्यात आली असून, आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धाडसत्रात पोलिसांनी ग्राम आसोली येथील मिनेश रवींद्र नागदिवे (२९) याच्याकडून हातभट्टीची १०० लिटर दारू, ३०० किलो मोहफुले व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ६४ हजार १०० रुपयांचा माल, संघर्ष सुदेश गडपायले (२१,रा. आसोली) याच्याकडून १०० किलो मोहफुले व हातभट्टीची ४० लिटर दारू असा एकूण आठ हजार रुपयांचा माल, रणवी रोशन डोंगरे (२७) कडून आठ हजार ५०० रूपये किमतीची ८५ लिटर दारू, छाया भीमा बन्सोड या महिलेकडून १२ हजार ५०० रुपयांची १२५ किलो मोहफुले, कैवल्या भजनदास गेडाम (५९) या महिलेकडून ५० हजार रुपये किमतीचे ५०० किलो मोहफुले, आरोपी राकेश राजेंद्र बन्सोड (२८) याच्याकडून तीन हजार रुपयांची मोहफुलांची ३० लिटर दारू, महेंद्र गोवर्धन बिंझाडे (४८) याच्याकडून पाच हजार रुपयांची ५० किलो मोहफुले तसेच ग्राम पांढराबोडी येथील आरोपी संतोष लिंबादास गणवीर याच्याकडून दीड हजार रुपये किमतीची हातभट्टीची १० लिटर दारू जप्त करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, आसाराम चव्हाण, सहाय्यक फौजदार वामन थाटकर, पोलीस हवालदार अण्णा ब्राह्मणकर, प्रदीप गणवीर, शेखर सुदाम खोब्रागडे, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संजय मरस्कोल्हे यांनी केली.

Web Title: One and a half lakh items including Mohful's liquor confiscated