One and a half lakh goods seized from Kachewani forest | काचेवानी जंगलातून दीड लाखाचा माल जप्त

काचेवानी जंगलातून दीड लाखाचा माल जप्त

तिरोडा : तिरोडा पोलिसांनी काचेवानी जंगल परिसरात धाड टाकून १ लाख ५० हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३ मार्च रोजी करण्यात आली. ८५ पोतींमध्ये १७०० किलो मोहफुल, ९ प्लास्टिक कॅनमध्ये ९० लिटर मोहफुलाची दारू, दारू गाळण्याचे साहित्य, २० किलो गरम सडवा व इतर साहित्य, असा एकूण १ लाख ५० हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात निशाण सूरज गिरी, योगेश रामदास मेश्राम, सूरज काशी गिरी, सर्व रा. भजेपार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, बिसेन यांनी केली.

Web Title: One and a half lakh goods seized from Kachewani forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.