अनेक वाहनचालकांवर गुन्हा
By Admin | Updated: August 14, 2016 01:58 IST2016-08-14T01:58:36+5:302016-08-14T01:58:36+5:30
रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस पोलिसांनी अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनेक वाहनचालकांवर गुन्हा
गोंदिया : रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस पोलिसांनी अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांधी पुतळ्याजवळ शुक्रवारच्या सायंकाळी ७.४५ वाजता दरम्यान आॅटो एमएच ३१ सीबी ८५३४ या वाहनाला आरोपी कलीम अलीम खान (३६) रा. गौतमनगर गोंदिया याने रस्त्यावर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बम्लेश्वरी खात गोदाम ढिमरटोली येथे ट्रक एम पी ०९ के ९३३१ या वाहनाला आरोपी रतन श्रावण कुाकडीबुरे (३८) रा.कटंगीकला याला रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभे करून ठेवलेहोते. तिसरी कारवाई ढिमरटोली परिसरातच शुक्रवारच्या सायंकाळी ५.१० वाजता दरम्यान करण्यात आली. ट्रक एमएच ३७ के ३७५१ या वाहनाला आरोपी राधेलाल दिवांंजी हिंगे (५०) रा. गौतमनगर याने वाहनाला रस्त्यावर उभे करून ठेवले होते.
चौथी कारवाई याच परिसरात शुक्रवारच्या सायंकाळी ६ वाजता दरम्यान ट्रक क्र. एमएच ३५ के ५०९१ या वाहनाला आरोपी रेशीमसिंग गुप्तासिंग भट्टी (४४) रा. फुलचूरटोला याने रस्त्यावर उभा करून ठेवला होता. शहराच्या सेलटॅक्स कॉलनीतील देवेंद्र हेमराज नागवंशी (२५) याने आपल्या आॅटोला गांधीला प्रतिमा येथे उभा करून ठेवले होते. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोतीनगर टी पार्इंट येथे बुलेरो सीजी ०८ वाय १४३८ या वाहनाला शुक्रवारच्या दुपारी २ वाजता दरम्यान आरोपी भूवन हेडाऊ रब्जफ (२७) रा. महीस नवगाव जि. भलोड (छत्तीसगड) याने रस्त्यावर उभी करून ठेवली होती. सालेकसाच्या बसस्थानकावर मार्शल एमएच २४ सी १७१२ या वाहनाला धोकादायक स्थितीत उभा करून ठेवल्याने आरोपी दीपक गणवीर (२२) याच्यावर गुन्हा नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)