मुख्याध्यापकाचा घेराव करणाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 23:58 IST2016-09-02T23:58:15+5:302016-09-02T23:58:15+5:30

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवेगाव/धापेवाडा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक

Offense for Headmistress Scene | मुख्याध्यापकाचा घेराव करणाऱ्यांवर गुन्हा

मुख्याध्यापकाचा घेराव करणाऱ्यांवर गुन्हा

गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवेगाव/धापेवाडा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगदीश प्रेमलाल कुरंजेकर (४५) यांच्यावर गावकऱ्यांनी शालेय पोषण आहारात भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करीत पाच जणांनी त्यांचा शाळेत घेराव केला. ही घटना १ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. त्यांच्या शासकीय कामात हस्तक्षेप करून त्यांना शिविगाळ करून ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली. त्यावरून हितेंद्र चौरागडे (५०) रा.नवेगाव, कवळू नेवारे (२६), बुधराम नेवारे (३८) नवेगाव, कैलास ठाकरे (३५) रा.नवगाव, धर्मराज राहो (४९) रा.नवेगाव या पाच जणांविरूध्द भादंविच्या कलम ३५३, ४४७, १४३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offense for Headmistress Scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.