Odorless and tasteless patients are found | आढळताहेत गंध व चव न येणारे रूग्ण

आढळताहेत गंध व चव न येणारे रूग्ण

ठळक मुद्देरुग्णांत या लक्षणांची भर, कोरोनाचा धोका आणखीच वाढला

कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ताप, सर्दी व खोकला असल्यास ती कोरोना संसर्गाची लक्षण असल्याचे सांगीतले जात आहे. तर गंध व चव न येणे ही सुद्धा कोरोनाची लक्षणे असल्याचे सांगीतले जात असतानाच जिल्ह्यात गंध व चव न येणारे रूग्ण आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्ह्यात आता या लक्षणांची भर पडली असून कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कोरोनाने जगाला हेलावून सोडले असून नव्यानेच मिळून आलेल्या या विषाणूबाबत कुणीही जाणत नव्हते. त्यामुळे प्राथमिक अभ्यासानुसार ताप, सर्दी व खोकला ही कोरोनाची लक्षणं सांगीतली जात होती. यामुठळे नागरिक आता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नवनवे प्रयोग करून स्वत: ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाकडून कोरोना रूग्णांना शोधून काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्वेक्षणातही ताप, सर्दी व खोकला यांचीच विचारणा व तपासणी केली जात आहे. यामुळे ताप, सर्दी व खोकला नसल्याने सर्वांनाच दिलासा मिळत होता. मात्र जिल्ह्याचे टेन्शन वाढविणारी आणखी २ लक्षणे येथील रूग्णांत दिसून येत असल्याचे आता चिकित्सकांकडून माहिती होत आहे. यात नाकाला गंध न येणे तर जिभेला चव नसणे यांचा समावेश आहे. खाजगी चिकित्सकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोजच्या तपासणीत त्यांना या लक्षणांचे रूग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच, आतापर्यंत ताप, सर्दी व खोकला या लक्षणांना धरून रूग्ण शोधण्याचे जे प्रयत्न केले जात होते. त्यात या आणखी २ लक्षणांची भर पडल्याने व तसे रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

वेळीच तपासणी करण्याची गरज
आतापर्यंत सर्दी, ताप व खोकला असल्यास रूग्ण स्वत:ची तपासणी करवून घेत होते. त्यामुळे रिपोर्टनुसार ते स्वत: वेगळे करून घेत किंवा भर्ती करून कोरोनाचा संसर्ग पसरवित नव्हते. मात्र आता चव न येणे तसेच गंध नसलेले रूग्ण आढळून येत असून कित्येकांना या लक्षणांबाबत माहिती नाही. अशात अजानतेपणात ते लोकांत मिसळून राहत असून कोरोनाचा संसर्ग पसरवित आहेत. ज्यांना एखाद्या पदार्थाची गंध व चव येत नसल्यास त्यांनी स्वत:ला वेगळे करून सर्वप्रथम तपासणी करून घ्यावी असे चिकित्सक सांगत आहेत.

Web Title: Odorless and tasteless patients are found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.