१२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:26+5:30

अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले.

Obtain ownership rights for 2 acre subspecies | १२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त

१२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त

ठळक मुद्देपट्ट्यांचे वाटप : अखेर मगरडोह ग्रामवासीयांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मगरडोहला अखेर वनहक्क अधिकार २००६ अंतर्गत १२२ एकरातील गौण वनउपजांचे संरक्षण व्यवस्थापन व विनिमय करण्याचे स्वामित्व हक्क प्राप्त झालेले आहेत.
सन २०१२ पासून तत्कालीन उपसरपंच तुुलाराम भोगारे यांनी सामुहिक वनहक्काचे प्रकरण आवश्यक कागदपत्रांसह महसूल विभागात सादर करुन त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. आपल्या गावासाठी प्रयत्न करीत असलेल्या वडिलाची जवाबदारी स्विकारत विद्यमान सरपंच देवविलास तुलाराम भोगारे आणि सामुहिक वनहक्क समितीचे सचिव देवेंद्र गावळ यांनी गावकऱ्यांसाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ग्रामपंचायत मरगडोहला यश आले. पट्ट्यांचे वितरण स्थानिक उपविभागीय अधिकारी देवरी यांच्या दालनात विद्यमान सरपंच आणि ग्रामवासीयांना उपविभागीय कार्यालयामार्फत वितरित करण्यात आले. प्राप्त झालेल्या पट्ट्याच्या क्षेत्रात उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनात शासन निर्णयाच्या अधिन राहून ग्रामविकास आराखडा तयार केलेला आहे.त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. यासाठी आ.संजय पुराम व माजी आ.रामरतन राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार विजय बोरुडे यांना ग्रामपंचायत मगरडोह व सामुहिक वन हक्क समिती यांच्यासह संपूर्ण ग्रामवासीयांनी धन्यवाद देत आभार मानले आहे. या समितीच्या निर्मितीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी सहकार्य केले ते उपसरपंच महेंद्र गावळ, वनविभागाचे सर्वेअर शेख, उपविभागीय कार्यालयाचे फरकडे, ग्यानीराम गावळ, रमेश आचले, विनोद आचले, मनोहर भोगारे, धनलाल भोयर, धनराज कोरेटी, संगणक चालक हेमंत करंडे, रोजगार सेवक लालचंद भोयर यांच्यासह सर्व ग्रामवासीयांनी सहकार्य केले.

Web Title: Obtain ownership rights for 2 acre subspecies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.