३७.९९ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट
By Admin | Updated: December 4, 2015 01:59 IST2015-12-04T01:59:18+5:302015-12-04T01:59:18+5:30
शेतकऱ्यांसाठी नेहमीच आधार ठरत असलेल्या जिल्हा बँकेला आता रबी हंगामासाठी ३७.९९ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

३७.९९ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट
जिल्हा बँक : थकबाकी धडकी भरणारी
गोंदिया :शेतकऱ्यांसाठी नेहमीच आधार ठरत असलेल्या जिल्हा बँकेला आता रबी हंगामासाठी ३७.९९ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप करण्यात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच आघाडीवर असते. मात्र कर्जवाटपात आघाडी घेत असतानाच वसुली मात्र त्याप्रमाणात होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत चालल्याचेही दिसून येत आहे.
जिल्ह्याला धानाचे कोठार अशी ख्याती देण्यात आली असली तरीही येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती लपलेली नाही. निसर्गाचा कोप यासाठी महत्वपूर्ण कारण असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते. यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. असे असले तरीही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मियता दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
थकबाकी ३७३.८० कोटींची
जिल्हा बँक कर्जवाटपाप्रमाणे थकबाकीतही आघाडीवर असल्याचेही दिसून येते. बँकेची थकबाकी आजघडीला सुमारे ३७३ कोटी ८० लाख ६५ हजार रूपयांवर गेली आहे. यात अल्पमुदती व मध्यम मुदती कर्जांचा समावेश आहे. नापिकीच्या स्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जवाटप करताना बँकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय कर्जवसुलीसाठी काही निर्बंधही लावण्यात आले असल्याने दिलेल्या कर्जाची वसुली करणे सहज शक्य होत नाही. यातूनच थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे.