ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By Admin | Updated: May 31, 2014 00:00 IST2014-05-31T00:00:02+5:302014-05-31T00:00:02+5:30
भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
गोंदिया : भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याना समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
सन २0११-१२ व सन १२-१३ या दोन वर्षातील शिष्यवृत्ती इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना मिळाली नाही. शासन बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ५0 वर्षानंतर ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती देण्यात आली. परंतु अवघ्या १0 वर्षातच ही शिष्यवृत्ती देणे बंद केले. मागील दोन वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांंमध्ये महाराष्ट्र सरकारप्रती असंतोषाचे वातावरण आहे. भारतीय संविधानात नमू असताना ओबीसींचा हक्क डावलून त्यांचा हक्क इतर वर्गातील लोकांना देण्याचा षड्यंत्र महाराष्ट्र सरकारचा आहे. शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांंवर अन्याय न करता त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणी ओबीसी वर्गातील विद्यार्थी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)