ओबीसी कृती समितीने केला नाना पटोले यांना घेराव
By Admin | Updated: March 31, 2016 02:00 IST2016-03-31T02:00:09+5:302016-03-31T02:00:09+5:30
सरकारने ओबीसी समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खासदार नाना पटोले यांना फुलचूर नाक्यावर

ओबीसी कृती समितीने केला नाना पटोले यांना घेराव
गोंदिया : सरकारने ओबीसी समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खासदार नाना पटोले यांना फुलचूर नाक्यावर ओबीसी कृती समितीने घेराव केला. यावेळी शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणविता, ओबीसीच्या मुद्यांवर प्रश्न उपस्थित करता, मुख्यमंत्र्यासोबत या विषयावर चर्चा घडवून आणू असे आश्वासन देता, पण तुमचे सरकार असूनही एका ओबीसी विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी आत्महत्या करावी लागली. त्यामुळे तुमच्या सरकारचा आणि मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खा.पटोले यांनी तुमची समिती सर्वपक्षिय असल्यामुळे त्याला राजकीय म्हणता येणार नाही. सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसींबद्दल अपशब्द काढले असतील तर ते योग्य नाही, त्याबद्दल त्यांना विचारणा करून राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, अमर वराडे, मनोज मढे, राजेश नागरीकर, गणेश बर्डे, खेमेंद्र कटरे, बी.एन. करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे, शिशिर कटरे, भूपेंद्र हरिणखेडे, सावन कटरे, विनायक येडेवार, शंकर लहाने, सुनील पटले, मिलिंद समरीत, शुभम बनोठे, रोहित नंदागवळी, अक्षय रामटेके, शैलेश चिखलोंढे, योगराज उपराडे, कृपाल लांजेवार, चोकलाल येळे, राजकुमार फाये, युवराज येळे, लालदास दसरिया, निर्देश साखरे, रामेश्वर पंधरे, मनिष पुसाम, योगेश फुंडे, शोभेलाल लिल्हारे, शोभाराम शहारे, भरत शरणागत, प्रभाकर दोनोडे, राजू काळे, बिसराज चर्जे, डी.सी.कटरे, महेंद्र शरणागत, कमल राणे, जगदीश रहांगडाले, मनोज बिसेन, निलम हलमारे आदींचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)