पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:27+5:302021-02-10T04:29:27+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून ...

पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरपोच
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत, परंतु शाळेत माध्यान्ह भोजन शिजवून देण्यावर बंदी असल्यामुळे पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामधून तेल, तिखट गायब झाले, अशी पालकांची ओरड आहे. शासनाकडून शालेय पोषण आहारांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जात असून, त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर ग्रॅम तांदूळ प्रति दिवस तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दिडशे ग्रॅम तांदूळ दिले जाते. कोरोना काळात शाळा बंद होत्या, परंतु पोषण आहार नियमित पुरविल्या जात होते. डिसेंबर ते जानेवरी या दोन महिन्यांच्या तांदूळ, चणा, मसूरडाळ शाळांना प्राप्त होऊन विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आले. त्यामध्ये तेल, तिखट, मटकी आणि मूग शासनाकडून पुरविण्यात आले नाहीत, असे सांगण्यात आले. अजूनही शाळा पूर्वपदावर आल्या नाहीत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, शासनाकडून आलेली कडधान्य त्वरित विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शाळास्तरावरून केले जात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
..........
तेल, तिखट, मूग, मटकीचा पुरवठा करा
काही पालक म्हणतात की, नुसती कडधान्ये देऊन काय उपयोग, त्याला शिजविण्यासाठी आवश्यक असणारी साहित्य तेल, तिखट, मूग असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे पोषण कसे होईल, ज्या गोष्टीसाठी शाळांच्या माध्यमातून सकस आहार योजना लागू केली, ती गोष्ट म्हणजे कुपोषणावर मात करणे, यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय उपोषणावर मात करणे शक्य नाही. परिणामी, शासनाचा उद्देश परिपूर्ण होणार नाही. याची दखल घेऊन शासनाने तेल, तिखट, मूग, मटकी यांसारख्या वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची मागणी या ग्रामीण व आदिवासी भागातील पालकांनी केली आहे.