मंगळवारी जिल्ह्यात ६ कोरोना बाधित आढळले. यात गोंदिया तालुक्यातील ३, तिरोडा १, गोरगाव १ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. मागील पंधरा दिवसातील कोरोना बांधितांच्या आकड्यांवर नजर टाकली असता त्यात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता कोरोनाचा जिल्ह्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत ६५५५३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५४०५० नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अन्टीजन टेस्ट केली जात असून, यांतर्गत ६५५५३ नमुने तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी ५९४४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४२०९ कोरोना बाधित आढळले असून, यापैकी १३९०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १२० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST