शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:00 AM

१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळेच दोन दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांपैकी एक जण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण पुन्हा कोरोना बाधित आढळले.

ठळक मुद्देएकाच दिवशी १५ कोरोना बाधितांची नोंद : अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ वर : दिल्लीवरुन आलेल्या दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला.सोमवारी एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१६) आणखी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात दुबईहून १३ व दिल्लीहून परतलेल्या २ जणांचा समावेश आहे. मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे.१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळेच दोन दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांपैकी एक जण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण पुन्हा कोरोना बाधित आढळले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. सोमवारी (दि.१५) एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा १५ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पाच दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात ३२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील जवळपास तीनशे नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरानाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. मागील आठवडाभराच्या कालावधीत दुबईहून शंभरावर नागरिक परतले आहे. तर दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून काही जण जिल्ह्यात दाखल झाले. या सर्वांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.यासर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी रविवारपर्यंत एकूण तीन जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सोमवारी एकाच दिवशी १४ आणि आज (दि.१६) १५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुबईहून परतलेल्यांपैकी आतापर्यंत ३० जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर दिल्लीहून परतलेल्या दोन जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी एकाच दिवशी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात आत्तार्पंत एकूण १०१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा उद्रे्रक झाल्याचे चित्र आहे.तिरोडा तालुका सेफतिरोडा तालुक्यातील बरेच नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे आता आपल्या स्वगृही परतत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने बाहेरील, जिल्हा, राज्य आणि विदेशातून परतलेल्या नागरिकांना गोंदिया येथील शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. या लोकांचा तिरोडा तालुक्यातील नागरिकांशी संपर्क न आल्याने या तालुक्यात संसर्ग झाला नसून तिरोडा तालुका पूर्णपणे सेफ आहे.१३६८ स्वॅब नमुन्यांची तपासणीकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १३६८ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत एकूण १०१ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर १२२८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ३९ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या