बाधित अन् मात करणाऱ्यांची संख्या सेम-सेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:20+5:302021-08-13T04:33:20+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. गुरुवारी (दि. १२) एका बाधिताने मात केली, तर नवीन एका ...

Number of affected endings Sem-Sem | बाधित अन् मात करणाऱ्यांची संख्या सेम-सेम

बाधित अन् मात करणाऱ्यांची संख्या सेम-सेम

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. गुरुवारी (दि. १२) एका बाधिताने मात केली, तर नवीन एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे बाधित आणि मात करणाऱ्या रुग्णांची संख्या सेम-सेम होती.

काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी ४१८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ३२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ९७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२३ टक्के आहे. जिल्ह्यातील आठपैकी सहा तालुके कोरोनामुक्त झाले आहे. सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात होते. मात्र, हा तालुकासुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे ही बाब जिल्हावासीयांसाठी समाधानकारक आहे. गोंदियासह तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, देवरी, गोरेगाव हे तालुकेसुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव या दोनच तालुक्यांत प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे हे तालुकेसुद्धा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४४०६१० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२२३०२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८३०८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९५ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०४९१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

................

कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.२७

कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे, तर सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ दोन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.२७ टक्के असून, तो राज्यापेक्षा दोन टक्क्यांनी अधिक आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

..............

६५४१८२ नागरिकांचे लसीकरण

कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडूृन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ६५४१८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ५० च्यावर आहे.

Web Title: Number of affected endings Sem-Sem