शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यामुळे बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला.

ठळक मुद्देएकूण कोरोना बाधितांची संख्या १०२ : बाहेरुन आलेल्यांमुळे वाढला संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी १४ तर मंगळवारी (दि.१६) १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर बुधवारी पुन्हा एका जणाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३ वर पोहचला आहे. जिल्ह्यात दुबई आणि दिल्लीहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला.जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यामुळे बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत कोरोना बाधितांचा आकडा ६८ वर पोहचला होता. २१ दिवसांच्या कालावधीत हे सर्व कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले. त्यामुळे १० जूनला जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र दुबईहून तिरोड्यातील शंभराहून अधिक नागरिक परतले. यापैकी तीन जणांचे स्वॅब नमुने रविवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले. तर सोमवारी (दि.१५) एकाच १४ आणि मंगळवारी दुबईहून परतलेल्या १५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आज (दि.१७) पुन्हा एका जणाचा नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा सहा दिवसांच्या कालावधीत ३३ वर पोहचल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने आतापर्यत आढळून आलेले सर्व कोरोना बाधित हे बाहेरुन आलेले असून जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित नाही. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या १०२ वर पोहचली आहे. यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.१२६४ नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १४२२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १०२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १२६४ स्वॅब नमुने हे कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ५६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळाकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.शासकीय क्वारंटाईन कक्षात १०६० जणकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जात आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या स्थितीत १०६० आणि होम क्वारंटाईमध्ये १६६६ असे एकूण २७२६ जण क्वारंटाईन आहेत.प्रयोगशाळेमुळे स्वॅब नमुने तपासणीची संख्या वाढलीगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नमुन्यांचा चाचणी अहवाल सुध्दा लवकर प्राप्त होत आहे. तर येथे प्रयोगशाळा सुरू झाल्याने स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण सुध्दा वाढविण्यात आले असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या