‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले

By Admin | Updated: February 3, 2016 01:54 IST2016-02-03T01:54:35+5:302016-02-03T01:54:35+5:30

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने अनेक वेळा शोधमोहीम राबविली आहे.

NSS searches for 105 out-of-school children | ‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले

‘एनएसएस’ने शोधली १०५ शाळाबाह्य मुले

शिक्षणाचा हक्क : आठवीपर्यंत शिकविणार
गोंदिया : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाने अनेक वेळा शोधमोहीम राबविली आहे. मात्र तरीही समाजात समाजात शाळाबाह्य मुले आढळत आहेत. १ ते ३० जानेवारीदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांमार्फत पुन्हा एकदा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. त्यात जिल्हाभरात १०५ मुले आढळून आली आहेत.
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी २८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली. ४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांची सभा झाली. जिल्हा व तालुकास्तरीय माहिती संलग्न करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी सर्वेक्षणात सहकार्य केले. सर्वेक्षण अचूकरित्या व्हावे यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
जिल्ह्यात कधीच शाळेत न गेलेले २३ मुले व १६ मुली, शाळेत सतत ३० गैरहजर असणारी ५७ मुले व ११ मुली असे ८० मुले आणि २७ मुली मिळून १०५ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गोरेगाव येथील बसस्थानकावर जडीबुटी विकणाऱ्या लोकांची २७ मुले कधीही शाळेत गेली नव्हती.
त्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी, विषयतज्ज्ञ, विस्तार अधिकारी, गट समन्वयक गेले तरीही त्यांनी शाळेत जाण्यात रस दाखविला नाही. नाईजालास्तव पोलिसांच्या मदतीने त्या मुलांना शाळेत पाठविण्यात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यशस्वी राहिले.(तालुका प्रतिनिधी)

अशी आढळली मुले

गोंदिया तालुक्यात कधीच शाळेत न गेलेले ८ मुले, ३ मुली आढळले. ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यामध्ये ४६ मुले, ५ मुली असे एकूण ६२ मुले शाळाबाह्य आढळले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेला एक मुलगा आढळला. ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यामध्ये ५ मुले, एक मुलगी असे एकूण ७ मुले शाळाबाह्य आढळले.
गोरेगाव तालुक्यात कधीच शाळेत न गेलेले १४ मुले व १३ मुली आढळले. एकूण २७ मुले शाळाबाह्य आढळले.
सालेकसा तालुक्यात ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यांमध्ये १ मुलगा व १ मुलगी असे एकूण २ मुले शाळाबाह्य आढळले.
सडक अर्जुनी तालुक्यात ३० दिवस सतत गैरहजर असलेल्यांमध्ये ४ मुले व ३ मुली असे एकूण ७ मुले शाळाबाह्य आढळले.

Web Title: NSS searches for 105 out-of-school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.