न.प. मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By Admin | Updated: February 21, 2016 01:00 IST2016-02-21T01:00:14+5:302016-02-21T01:00:14+5:30

विशिष्ट कामांसाठी आलेला निधी अन्य खात्यांत वळविल्याप्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना ....

N.P. Show reasons to the magistrates | न.प. मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

न.प. मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

प्रकरण निधी वळविल्याचे :
२२ तारखेपर्यंत मागितले उत्तर

गोंदिया : विशिष्ट कामांसाठी आलेला निधी अन्य खात्यांत वळविल्याप्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांना नगर विकास विभागाच्या सहसचिवांनी ‘शोकॉज नोटीस’ पाठविली आहे. या नोटीसमधून त्यांनी मुख्याधिकारी वाहूरवाघ यांच्याकडून २२ तारखेपर्यंत खुलासा मागितला आहे.
मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी ३ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद ्रशासनाच्या युआयडीएसएसएमटी व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी असलेल्या निधीच्या व्याजाची तीन कोटी ५० लाख रूपयांची रक्कम नगर परिषदेच्या जनरल खात्यात व अन्य खात्यात वळती केली होती. हा निधी संबंधीत योजनेसाठीच खर्च करावयाचा होता. असे असतानाही मुख्याधिकाऱ्यांनी ही रक्कम अन्यत्र वळती केली.या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना महराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली. नगरविकास विभागाच्या सहसचिवांनी हे पत्र पाठविल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: N.P. Show reasons to the magistrates