आता वनविभागानेच आमच्या जिवाचे रक्षण करावे.. ; सूरगावकरांची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:56 IST2021-02-15T13:56:12+5:302021-02-15T13:56:34+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सूरगाव या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला असून, नागरिकांनी अखेरीस वनविभागाकडे स्वत:च्या रक्षणासाठी विनवणी केली आहे.

आता वनविभागानेच आमच्या जिवाचे रक्षण करावे.. ; सूरगावकरांची आर्त हाक
ठळक मुद्देसहा दिवसांपासून वाघांचा मुक्काम रात्रीच
लोकमत न्यूज नेवटर्क
गोंदिया: जिल्ह्यातील सूरगाव या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला असून, नागरिकांनी अखेरीस वनविभागाकडे स्वत:च्या रक्षणासाठी विनवणी केली आहे.
या भागात एक आठवड्यापासून बिबट्याची दहशत आहे. घरांच्या गोठ्यातील कोंबड्या, कुत्री पळविली जात आहेत. हा सगळा जंगलव्याप्त परिसर आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र त्याचा काहीएक फायदा नाही.
कारण वाघ रात्रीच्या वेळी हल्ला चढवतो. जिथे गोठ्यातील जनावरांसाठी तो निर्धास्त फिरत आहे, तसाच तो उद्या येथील माणसांनाही उचलून नेऊ शकतो, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.