शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

२८० बालकांना नवजीवन

By admin | Updated: December 11, 2014 23:08 IST

सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई

सिकलसेलग्रस्तांना दिलासा : रक्त संकलनात गोंदिया आघाडीवर
गोंदिया : सिकलसेलच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या रुग्णांना वेळोवेळी रक्ताचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी असणाऱ्या बाई गंगाबाई रुग्णालयावर नेहमीच रक्तपुरवठ्याचा ताण पडतो. मात्र त्या ताणावर मात करीत या रक्तपेढीने पूर्व विदर्भात सर्वाधिक रक्तसंकलन करीत सिकलसेलने ग्रस्त असणाऱ्या २८० बालकांना नवजीवन दिले आहे.
बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतर्फे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रभावीपणे ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम राबविली. त्यामुळे संपूर्ण विदर्भात गोंदिया जिल्ह्याने मासिक १२०० युनिट रक्त संकलन करून रेकॉर्ड ब्रेक करीत इतर जिल्ह्यांना मागे टाकले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेत प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिंदे यांनी स्वत: रक्तदान करुन जि.प. मधील सर्व कर्मचाऱ्यांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. त्यात १०१ युनिट रक्त बाई गंगाबाई रक्तपेढीला मिळाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बालक दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी गोंदिया पंचायत समितीत गटविकास अधिकारी वालकर व भांडारकर यांच्या नेतृत्वात घेतलेल्या शिबिरातही १०० रक्त युनिट संकलित करण्यात आले.
धापेवाडा, सडक/अर्जुनी, सौंदड येथेही रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०१४ या कालावधीत जिथे चंद्रपूर जिल्ह्यात ६३०, गडचिरोली-६१०, भंडारा-९०० व वर्धा-२१६ याप्रमाणे युनिट रक्त संकलित झाले तिथे बाई गंगाबाई रक्तपेढीत महिनाभरात १२०० युनिट रक्त संकलित झाले. गोंदिया जिल्ह्यातील या रेकॉर्ड ब्रेक ऐच्छिक रक्त संकलनाबद्दल उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी विभागीय बैठकीमध्ये रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या विशेष प्रयत्नांसाठी त्यांचे कौतुक केले.
ऐच्छिक रक्त संकलनातून गोळा झालेल्या या रक्तसाठ्यातून गोंदिया जिल्ह्यातील २८० सिकलसेल बालरुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यात मयुर कोटांगले, सकिना जुडो, दीक्षा बसाने, प्राज्वल राघोर्ते, समीक्षा सहारे, असित मडावी, दीक्षा कोठेवार, सावनी भोतमांगे,बनकर, लक्ष्मी मस्के, तरुण चित्रीव, प्रियंका डोंगरे, रुपाली ठाकरे, फैय्याज शेख, पारस नंदेश्वर, आदित्य लिल्हारे, कुणाल वाघाडे, माला मेश्राम, मयुर नंदेश्वर, सौरभ दमाहे, रौनक रामटेके, विवेक जांभुळकर, उमेश मेश्राम, हेमलता बोरकर, राजा राऊत, पंकज वालदे, समीक्षा सहारे, सिंधु उके, संदीप शेंडे, प्रणय बोरकर, रितीक शेंडे, स्वाती सावणकर, सायली वाहणे, श्रेया टेंभुर्णे, रिषभ टेंभुर्णे, निकीता जांभुळकर, मंदा गजभिये, चेतन सोनावणे, रणजीत डोंगरे यांच्यासह इतर अशा एकूण २८० बालकांचा समावेश आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील डे केअर सेंटरमध्ये व शहरातील विविध बालरोग तज्ज्ञांकडे मोफत रक्तपुरवठा केल्याने त्या बालरुग्णांना नवजीवन मिळू शकले. (जिल्हा प्रतिनिधी)