शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

चार विधानसभेतील १६ उमेदवारांंना नोटीस

By admin | Updated: October 11, 2014 01:46 IST

अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची ...

गोंदिया : अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची योग्य माहिती न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने १६ उमेदवारांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे त्यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे राजकुमार कुथे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, राष्ट्रवादीचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, भाजपचे विनोद अग्रवाल यांनी खर्च कमी दाखविल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रातील केशव भोयर या अपक्ष उमेदवाराने आपल्या खर्चाचा हिशेबच सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सहा उमेदवारांना नोटीस मिळाली. त्यात अपक्ष महेश शेंडे व दिलीप वालदे या उमेदवारांनी खर्च सादरच केला नाही, तर अजय लांजेवार, काँग्रेसचे राजेश नंदागवळी, दिलवर्त रामटेके, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्या खर्चात तफावत असल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर, शिवसेनेचे पंचम बिसेन, भाजपचे विजय रहांगडाले, बसपाचे दीपक हिरापुरे व अपक्ष दिलीप बंसोड यांनी खर्च कमी दाखविल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करण्यासाठी सुरत येथून खर्च निरीक्षक ललित बिष्नोई आले आहेत. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी तीन वेळा केली जाते. उमेदवारांच्या खर्चाचे वेळापत्रक निवडणूक विभागाने ठरवून दिले आहे. उमेदवारांसाठी अ‍ॅनेक्झर १४ भरून द्यायचा असतो. यात दररोज काय खर्च केला याचा लेखाजोखा उमेदवाराला निवडणूक विभागाला सादर करायचा असतो. अ‍ॅनेक्झर १४ अ मध्ये दैनंदिन खर्च उमेदवारांना देणे बंधनकारक असतो. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम ७७ नुसार खर्च निरीक्षक जेव्हा मागेल तेव्हा उमेदवाराला तो हिशेब देणे बंधनकारक आहे. त्यात उमेदवारांची रोख नोंदवही असते. त्यात आवक-जावक व कॅश रजिस्टर नोंदणी केल्या जाते. तसेच उमेदवारांच्या बँकेच्या पासबुकच्या नोंदी देणे आवश्यक असते. उमेदवारांनी केलेला खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या आतच होणे गरजेचे असते. पण नोटीस बजावण्यात आलेल्या उमेदवारांनी या नोंदी व्यवस्थित घेतलेल्या नाहीत. (तालुका प्रतिनिधी)