कुलदीपचा खून नसून, आत्महत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST2021-07-14T04:33:49+5:302021-07-14T04:33:49+5:30

गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा रोडवरील कोठारी गॅस एजन्सी गोदामासमोरील जंगलात १२ जुलैरोजी सोमवारला सकाळी ७ ...

Not Kuldeep's murder, but suicide | कुलदीपचा खून नसून, आत्महत्याच

कुलदीपचा खून नसून, आत्महत्याच

गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा रोडवरील कोठारी गॅस एजन्सी गोदामासमोरील जंगलात १२ जुलैरोजी सोमवारला सकाळी ७ वाजता कुलदीप हिरालाल बिसेन (वय २१, रा. बरबसपू, बटाना) याचा मृतदेह आढळला. त्याचा खून नसून, त्याने जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिसात करण्यात आली. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात मृतकचे वडील हिरालाल नागोराव बिसेन (वय ५१, रा. बरबसपुरा) यांनी पोलिसात तक्रार केली आहे. कुलदीप हिरालाल बिसेन (२१) याला आरोपी बाबू खान (४९) व नदीम खान (४१, दोन्ही रा. गोंदिया) हे त्याला पैशाकरिता वारंवार त्रास देत होते. या छळाला कंटाळून कुलदीपने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांंनी आरोपी नदीम खानला अटक केली आहे. त्याला १५ जुलैपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे; तर बाबू खानला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०६,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस नायक न्यायमूर्ती करीत आहेत.

Web Title: Not Kuldeep's murder, but suicide