उत्तर आफ्रिकेतील डेमोसियल क्रेन गोंदियात
By Admin | Updated: November 11, 2015 01:19 IST2015-11-11T01:19:12+5:302015-11-11T01:19:12+5:30
कझाकिस्तान, उत्तर आफ्रिका व तुर्की या देशात आढळणारा डमोसियल क्रेन हा पक्षी गोंदियात यावर्षी आढळला आहे.

उत्तर आफ्रिकेतील डेमोसियल क्रेन गोंदियात
गोंदिया : कझाकिस्तान, उत्तर आफ्रिका व तुर्की या देशात आढळणारा डमोसियल क्रेन हा पक्षी गोंदियात यावर्षी आढळला आहे. या पक्ष्याचे छायाचित्र वन्यजीवप्रेमी रवी गोलानी यांनी टिपले आहे.
भंडारा, गोंदिया हे तलावांचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. नवेगावबांध तलावावर थंडीच्या दिवसाात मंगोलीया, सायबेरीया, कझाकिस्तान, बलुचिस्तान, रशिया, लद्दाख व उत्तर सायबेरीया येथून मोठ्या प्रमाणात पक्षी स्तलांतरीत होतात. नवेगावबांध येथे सन २००२ च्या आधी सायबेरीयन क्रेन हे पक्षी यायचे. परंतु आता ते पक्षी येणे बंद झाले. मागच्या वर्षी धापेवाडा उपसा सिंचनासाठी बांधलेल्या बांधामुळे त्या ठिकाणी कॉमन क्रेन हे पक्षी दिसले. यावर्षी प्रथमच डेमोसियल क्रेन या पक्ष्याची नोंद झाली. (तालुका प्रतिनिधी)