३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

By Admin | Updated: May 16, 2016 01:55 IST2016-05-16T01:55:48+5:302016-05-16T01:55:48+5:30

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

None of the 3066 work is going on | ३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

दीड महिना लोटला : ७७ गावांसाठी २०७० कामे प्रस्तावित
नरेश रहिले  गोंदिया
भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यातील एकही काम सुरू न झाल्यामुळे जलयुक्त शिवारची अंमलबजावणी कशी होते याचा प्रयत्य नागरिकांना येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी लोटला मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे एकही काम सुरू झाले नाही.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ साठी ७७ गावांचा समावेश करण्यात आला. मंजूर, प्रस्तावित व दुरूस्ती अशा ३०६६ कामांसाठी ९६ कोटी ३५ लाख ८० हजार रूपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले. यात ७१६ काम मंजूर करण्यात आले. सदर कामांवर २६ कोटी ३३ लाख ४७ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. यात कृषी विभागाच्या २८८ कामांवर ७ कोटी ४३ लाख ९२ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या ३० कामांवर ३ कोटी ६७ लाख १३ हजार, पंचायत समितीच्या ३९५ कामांवर १४ कोटी ६९ लाख ८१ हजार, जलसंधारणच्या ३ कामावर ५२ लाख ६१ हजार खर्च करण्यात येणार आहे.
प्रस्तावित २०७० नवीन कामांवर ५७ कोटी ९६ लाख ९३ हजार खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. यात कृषि विभागाचे १३९१ कामांसाठी ३१ कोटी ०९ लाख ३१ हजार, लघु सिंचन विभागाच्या २० कामांसाठी ३ कोटी २३ लाख ५० हजार, लघु सिंचन जलसंधारणाच्या २५ कामासाठी ६ कोटी २४ लाख ३२ हजार, वन विभागाच्या ६३४ कामासाठी १७ कोटी ३९ लाख ८० हजार रूपये देण्याचे ठरले.
आता दुसऱ्या टप्याची कामे पावसाळ्यानंतर होणार आहेत. त्यामुळे पावसाळ््यातील चार महिने ही कामे होणार नसून जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्प्यातील कामे कशी होतात हे बघायचे आहे.

Web Title: None of the 3066 work is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.