कोणत्याही ग्रा.पं.ने गावातील पथदिव्याचे बिल भरू नये ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:39+5:302021-07-05T04:18:39+5:30
देवरी : २३ जून २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार १५ व्या वित्त आयोगातून ग्रा.पं. स्तरावरील गावातील पथदिव्यांचे बिल भरण्यासंदर्भातील ...

कोणत्याही ग्रा.पं.ने गावातील पथदिव्याचे बिल भरू नये ()
देवरी : २३ जून २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार १५ व्या वित्त आयोगातून ग्रा.पं. स्तरावरील गावातील पथदिव्यांचे बिल भरण्यासंदर्भातील परिपत्रक शासनाने रद्द करावे. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रा.पं.ने आपल्या गावातील पथदिव्याचे थकीत वीज बिल भरू नये, असा निर्णय गोंदिया जिल्हा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे यांच्या उपस्थितीत गोरेगाव येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत कोविड संसर्ग काळात जे सरपंच व उपसरपंच लोकांना सेवा देताना मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना शासन स्तरावर ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व दवाखान्याचे बिलसुद्धा शासनाने भरणा करावे, गौन खनिजाकरिता प्रत्येक ग्रा.पं.हद्दीत गट मंजूर करून त्याकरिता लागणारे गौण खनिज शुल्क एमआरईजीएसने आगाऊ देण्यात यावे आदी महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले. बैठकीला सालेकसा तालुकाध्यक्ष संजू कटरे, आमगाव तालुकाध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, अर्जुनी मोरगावचे इंजि. हेमकृष्ण कापगते, गोंदियाचे प्रा. मुनिश रहांगडाले, तिरोडाचे नीतेश खोब्रागडे, गोरेगावचे सोमेश्वर रहांगडाले, सडक अर्जुनीचे सरचिटणीस दिनेश कोरे, जीवन लंजे, जगत नेताम उपस्थित होते.
.........
संघटनेची कार्यकारिणी गठित
बैठकीत सर्वप्रथम गोंदिया जिल्हास्तरीय सरपंच सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवीन जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी मुरदोलीचे सरपंच शशेंद्र भगत यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिवपदी मुंडीपारचे सरपंच नितीन टेंभरे यांची पुन्हा फेरनिवड व जिल्हा प्रसिद्धिप्रमुखपदी कटंगीचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे, जिल्हा संघटकपदी तांडाचे सरपंच प्रा. मुनिश रहांगडाले, जिल्हा संपर्क प्रमुखपदी तिगावचे सरपंच नरेंद्र शिवणकर यांची तर जिल्हा महिला उपाध्यक्षपदी मधू अग्रवाल, मानेगावचे सरपंच संगीता गणवीर, वडेगावचे उपसरपंच खेमराज खोटेले, दाभनाचे उपसरपंच डॉ. दीपक रहिले, देवाटोलाचे उपसरपंच जगत नेताम यांची निवड करण्यात आली.