एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही
By Admin | Updated: February 5, 2015 23:11 IST2015-02-05T23:11:56+5:302015-02-05T23:11:56+5:30
स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच समाजाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. वसतीगृहात मुलांना सर्व सुविधा प्राप्त होत असून त्याचा फायदा

एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही
देवरी : स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच समाजाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. वसतीगृहात मुलांना सर्व सुविधा प्राप्त होत असून त्याचा फायदा घेत मुलांनी शिक्षणाचा महत्त्व द्यावे. एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले.
आदिवासी प्रकल्प कार्यालयाद्वारे संचालित आदिवासी मुलांचे वसतीगृह देवरी येथे दोन दिवशीय वार्षिकोत्सव पार पडले. या वेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, देवरीमध्ये समाजकल्याण विभागाचे वसतीगृह तयार करण्याचे प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठवू. विद्यार्थीच देशाचे भावी कर्णधार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
राणी दुर्गावती, बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. अतिथींनी मार्गदर्शन केले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
उद्घाटन आ. पुराम यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, रा.स्व. संघाचे तालुका कार्यवाह कुलदीप लांजेवार, सहायक प्रकल्प अधिकारी राघोर्ते, विलास शिंदे, प्रशांत काळे, कोल्हारे, छेदीलाल शाहू, विजय बिंझलेकर, गृहपाल खंडारे, उईके, वाघमारे व करणाके उपस्थित होते.
प्रास्ताविक धर्मेंद्र घरत, संचालन व आभार जयेंद्र भोयर यांनी मानले.