नियमित वर्ग सुरू करण्यास हरकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:57+5:302021-07-04T04:19:57+5:30

सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च विद्यालयात गुरुवारी (दि.१) पालकांची वार्षिक आमसभा ...

No problem starting regular classes | नियमित वर्ग सुरू करण्यास हरकत नाही

नियमित वर्ग सुरू करण्यास हरकत नाही

सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च विद्यालयात गुरुवारी (दि.१) पालकांची वार्षिक आमसभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.

याप्रसंगी पर्यवेक्षक आर. के. कटरे, ग्रामपंचायत सदस्य उमराव मांढरे, पालक डाॅ. मुकुंदराव पारधी, पालक सुरेश वैद्य, पालक डाॅ. दिनेस पारधी उपस्थित होते. सभेत कोरोना नियमावलीचे पालन करीत सर्व वर्ग नियमित सुरू करण्यात हरकत नाही. शाळा प्रशासनाच्या वतीने पालक-शिक्षक सभेच्या ठरावाची सत्यप्रत शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) लेखी स्वरुपात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जे पालक हमीपत्र देतील त्यांच्याच पाल्यांना वर्गात प्रवेश राहील असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षक जी. टी. लंजे यांनी केले. प्रास्ताविक डी. डी. रंहागडाले यांनी केले. सभेला पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते. सभेसाठी शाळा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: No problem starting regular classes