परीक्षेसाठी दिली नाही परवानगी

By Admin | Updated: April 29, 2016 01:51 IST2016-04-29T01:51:54+5:302016-04-29T01:51:54+5:30

गोरेगाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत शिपाई रोशन हसनलाल लिल्हारे यांना आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे ..

No permission given for the exam | परीक्षेसाठी दिली नाही परवानगी

परीक्षेसाठी दिली नाही परवानगी

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत शिपाई रोशन हसनलाल लिल्हारे यांना आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे परीक्षेपासून वंचित रहावे लागले. या प्रकरणाची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना तक्रार करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही.
गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत रोशन लिल्हारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांतर्गत बीए अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ५ मार्चला सुट्टीसाठी अर्ज केले होते. १३ ते २० एप्रिलपर्यंत गोरेगाव येथील जगत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परीक्षा केंद्रावर दुपारी २.३० ते ५.३० वाजतापर्यंत परीक्षा द्यावयाची होती. लिल्हारेची ५ एप्रिल रोजी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जासह त्यांनी परीक्षेचे वेळापत्रकही जोडले होते. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय प्रमुख एन.जे. सिरसाटे यांनाही परीक्षेच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. परंतु त्यांनी १३ व २० एप्रिल रोजीची परीक्षेसाठी सुट्टी देण्यास नकार दिला. तसेच संबंधितांद्वारे अशी धमकीसुद्धा देण्यात आली होती की, जर तो कार्यालय सोडून गेला तर त्याचा वेतन कपात करण्यात येईल व पदमुक्तसुद्धा करण्यात येईल.
लिल्हारे यांनी यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनाही तक्रार केली आहे. लिल्हारे यांनी १३ एप्रिलच्या सुट्टीसाठी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज केले होते. कार्यालयाने सुट्टी देण्यास नकार दिला. यानंतर १५ एप्रिलला मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून माहिती दिली होती. १६ एप्रिलला एका दिवसाच्या बिनवेतन सुटीसाठी अर्ज केला होता.

Web Title: No permission given for the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.