रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार झाले नो पार्किंग झोन

By Admin | Updated: June 2, 2016 01:13 IST2016-06-02T01:13:28+5:302016-06-02T01:13:28+5:30

गोंदिया रेल्वे स्थानकातून दररोज १९ हजार ५०० च्या आसपास प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी उत्तर व दक्षिण भागात असे मुख्य दोन प्रवेशद्वार आहेत.

No parking zone at the entrance to the railway station | रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार झाले नो पार्किंग झोन

रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार झाले नो पार्किंग झोन

गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकातून दररोज १९ हजार ५०० च्या आसपास प्रवासी ये-जा करतात. त्यांच्यासाठी उत्तर व दक्षिण भागात असे मुख्य दोन प्रवेशद्वार आहेत. मात्र दोन्ही प्रवेशदारांवर वाहनधारकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दोन्ही प्रवेशदारांचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर सोडणे व तेथून घेऊन जाण्याकरीता दुचाकी व इतर प्रवासी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर येतात. ही वाहने अधिकृत पार्किगमध्ये न लावता प्रवेशद्वारासमोर लावली जातात. त्यामुळे प्रवाशांची व इतर वाहनांना येथून निघण्याकरीता अडचण निर्माण होवून प्रवेशद्वार परिसरात वाहनांची कोंडी निर्माण होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो.
रेल्वे प्रवाशांना धोका, गैरसोय किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम ३३ (१) (ब) (क) च्या अधिकाराचा वापर करून गोंदिया रेल्वेस्टेशन येथील उत्तर प्रवेशद्वारासमोरील परिसर वाहनांना ‘नो ड्रॉप अ‍ॅन्ड गो’ घोषित केला आहे. उत्तर गेटसमोरील परिसरात एटीएम गेटसमोरील परिसर नो पार्किंग झोन घोषित केला आहे.
दक्षिण गेटसमोरील परिसरात लोखंडी पोलच्या आतील परिसर हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: No parking zone at the entrance to the railway station