नवीन बाधितांची भर नाही, रुग्ण संख्या स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:12+5:302021-09-11T04:29:12+5:30

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत होती. मात्र शुक्रवारी (दि.१०) रुग्णवाढीला ब्रेक लागला असून ...

No new infections added, patient numbers steady | नवीन बाधितांची भर नाही, रुग्ण संख्या स्थिर

नवीन बाधितांची भर नाही, रुग्ण संख्या स्थिर

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत होती. मात्र शुक्रवारी (दि.१०) रुग्णवाढीला ब्रेक लागला असून बाधित आणि मात करण्याची संख्या शून्य होती. त्यामुळे रुग्ण संख्या स्थिर होती.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २८६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ५७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४९४५५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९६०६ नमुन्यांची आरटीसीपीआर तर २१९८४९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२११ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले यापैकी ४०४९७ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थिती त केवळ ८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

........................

६० टक्क्यांवर लसीकरण

कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १२५ लसीकरण केंद्रावरुन लसीकरण सुरु असून आतापर्यंत ८६२९८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ६० टक्केच्यावर आहे.

..................

धोका टळलेला नाही काळजी घ्या

कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही, सध्या सण आणि उत्सव सुरु हे सर्व सुरळीत आणि आनंदात पार पडण्यासाठी सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करुन कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.

- विनोद अग्रवाल, आमदार

...................

स्वत:ची आणि कुटुंबीयांची घ्या काळजी घ्या

सण आणि उत्सवामुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढली आहे. त्यातच नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

- मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख शिवसेना

....................

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे करा पालन

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तरच आपण कोरोनाला पायबंद लावू शकतो. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी.

- किशोर डोंगरवार, अध्यक्ष, महा. शिक्षक समिती

Web Title: No new infections added, patient numbers steady