एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:30+5:30

गोंदिया तालुक्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि.२) आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसह दौरा केला. या वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. झालेले परतीच्या पावसाने धान पिकांचे झालेले नुकसान पाहून आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले चेहरे पाहून आ. अग्रवाल सुध्दा काही क्षण अस्वस्थ झाले होते.

No farmer should be deprived of help | एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

ठळक मुद्देविनोद अग्रवाल । नुकसानीची केली प्रत्यक्ष पाहणी, मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून धानपिक मातीमोल झाले आहे.त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण यंत्रणेने करुन एकही शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार याची काळजी घेण्याची सूचना आ. विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना केली.
गोंदिया तालुक्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि.२) आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसह दौरा केला. या वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. झालेले परतीच्या पावसाने धान पिकांचे झालेले नुकसान पाहून आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले चेहरे पाहून आ. अग्रवाल सुध्दा काही क्षण अस्वस्थ झाले होते. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट आणि कुटुंबासह वर्षभर शेतात राबवून मेहनतीने पीक घेतले होते. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पूर्णपणे पाणी फेरले. पावसामुळे अनेक शेतातील धानाची तणस झाली तर काही धानाला अंकुर फुटल्याने शेतकºयांना पूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. परिणामी त्यांच्यावर अस्मानी संकट ओढावले असून कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे अशा स्थिती कृषी, महसूल आणि पीक विमा कंपनीच्या यंत्रणेने नुकसानीचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करुन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटात आपण गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आ.अग्रवाल यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते.शनिवारी दौऱ्याप्रसंगी तहसीलदार राजेश भांडारकर, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी अधिकारी रहांगडाले, जिल्हा कृषी अधिकारी शुक्ला,महसूल अधिकारी तिवारी, भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, मुनेश रहांगडाले, रामराज खरे, लखन हरिणखेडे, टिटुलाल लिल्हारे, पन्नालाल मचाडे, भरत लिल्हारे, धनंजय तुरकर, ग्यानचंद जमईवार, गजेंद्र फुंडे, कमलेश सोनवाने, चंद्रिकापुरे, सरपंच राजेश कोल्हे, रामू नशिने उपस्थित होते.

Web Title: No farmer should be deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती