लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : देशात कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविण्यात आले आहे. नागरिकांकडून ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस विभाग आपला जीव धोक्यात घालून कार्य करीत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी व घरात राहूनच कोरोना संसर्गाची लढाई जिंकावी यातच सर्वाचे हित दडलेले आहे. अशात विनाकारण गावात फिरणारे पोलीस कर्मचाºयांना आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा येथील ठाणेदार दीपक जाधव यांनी दिला आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. विनाकारण गावात फिरण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना इच्छा नसतानांही सौम्य लाठीप्रसाद देण्याचा पोलीस कर्मचाºयांना उपाय हातात घ्यावा लागत आहे. जमावबंदीचे कोणाकडूनही उल्लंघन होणार नाही याची सतत काळजी घेवून रात्रंदिवस तैनात राहून पोलीस पहारा देत आहेत. तसेच बाहेर राज्यातून कुणी येणार आहे याची दक्षता घेतली जात आहे.गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. शासनाने परवानाधारक दारु दुकान बंद केले आहेत. याचा फायदा घेत काही गावांत मोहफुलाची दारु काढून गावातील शांतता भंग केल्याचे प्रकार माहिती होताच त्यांच्यावर धाड टाकून गुन्हा नोंदविला जात आहे. अशात नागरिकांनी या लढ्यात सहकार्य करुन संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावे अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ठाणेदार जाधव यांनी दिला आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. विनाकारण गावात फिरण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही
ठळक मुद्देदीपक जाधव : फिरणाऱ्यांवर आता पोलीस कारवाई केली जाणार